AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IIFA 2023 | आधी केलं दुर्लक्ष, नंतर मारली मिठी; ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात सलमान-विकी जोरदार चर्चेत

"अनेकदा काही गोष्टींबद्दल विनाकारण चर्चा होत असते. त्यात काहीच तथ्य नसतं. व्हिडीओमध्ये गोष्टी जशा दिसतात, प्रत्यक्षात त्या तशा नसतात. त्याबद्दल बोलून काही उपयोग नाही", असं स्पष्टीकरण विकीने या व्हिडीओनंतर दिलं होतं.

IIFA 2023 | आधी केलं दुर्लक्ष, नंतर मारली मिठी; 'आयफा' पुरस्कार सोहळ्यात सलमान-विकी जोरदार चर्चेत
Salman Khan and Vicky KaushalImage Credit source: Instagram
| Updated on: May 28, 2023 | 1:17 PM
Share

अबू धाबी : आयफा पुरस्कार सोहळ्यातील सलमान खान आणि विकी कौशलचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून सोशल मीडियावर त्याचीच जोरदार चर्चा आहे. सलमानच्या बॉडीगार्डने विकीला सर्वांसमोर बाजूला केलं आणि सलमाननेही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, असं व्हायरल व्हिडीओवरून म्हटलं गेलं. त्यानंतर विकी कौशलने प्रतिक्रिया देत या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. आता पुन्हा एकदा या दोघांचा नवीन व्हिडीओ नेटकऱ्यांसमोर आला आहे. यामध्ये सलमान आणि विकी एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. या नव्या व्हिडीओमध्ये विकी रेड कार्पेटवर एका मुलाखतीसाठी उभा असतो. त्याचवेळी सलमान खान मागे वळून त्याला मिठी मारायला येतो. त्यानंतर हे दोघं गळाभेट घेतात.

सलमान – विकीचा वादग्रस्त व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये विकी कौशल सलमानपासून थोडा लांब उभा असल्याचं पहायला मिळाला होता. कारण सलमान त्याच्या बॉडीगार्ड्ससोबत एण्ट्री करत असतो. जसजसा सलमान जवळ येतो, तेव्हा विकी त्याच्याकडे हात पुढे करताना दिसतो. मात्र बॉडीगार्ड्सपैकी एक जण विकीला सलमानपासून दूर ढकलतो. सलमानसुद्धा विकीसमोर त्याचा हात पुढे न करता फक्त त्याच्याकडे पाहून पुढे निघून जातो. यानंतर विकीच्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्ट पहायला मिळतात. तरीसुद्धा तो दुसऱ्यांदा सलमानशी हात मिळवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हासुद्धा सलमान त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून जातो.

मिठी मारतानाचा नवीन व्हिडीओ

“अनेकदा काही गोष्टींबद्दल विनाकारण चर्चा होत असते. त्यात काहीच तथ्य नसतं. व्हिडीओमध्ये गोष्टी जशा दिसतात, प्रत्यक्षात त्या तशा नसतात. त्याबद्दल बोलून काही उपयोग नाही”, असं स्पष्टीकरण विकीने या व्हिडीओनंतर दिलं होतं. सलमान खान आणि कतरिना कैफ यांचं नातं जगजाहीर होतं. हे दोघं एकमेकांना डेट करत होते, अशी जोरदार चर्चा इंडस्ट्रीत होती. मात्र कतरिनाने विकी कौशलशी लग्नगाठ बांधली. त्यामुळे विकी आणि सलमानचे हे फोटो सोशल मीडियावर अधिक व्हायरल होत आहेत.

सलमान आणि कतरिना लवकरच ‘टायगर 3’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती सलमानने आयफा पुरस्कार सोहळ्याच्या पत्रकार परिषदेत दिली. या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर सलमान आणि कतरिनाचा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.