AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर सुम्बुलने सोडलं मौन; सावत्र आईबद्दल म्हणाली, “आधी आम्ही खुश होतो अन् आता..”

सुम्बुलच्या नव्या आईचं नाव निलोफर आहे आणि त्यांचा याआधी घटस्फोट झाला होता. निलोफर यांना दोन-अडीच वर्षांची मुलगी आहे. सुम्बुल पाच वर्षांची असतानाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. आता तिच्या आईशी कोणताच संपर्क नाही.

वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर सुम्बुलने सोडलं मौन; सावत्र आईबद्दल म्हणाली, आधी आम्ही खुश होतो अन् आता..
Sumbul Taukeer KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 13, 2023 | 3:29 PM
Share

मुंबई : ‘इमली’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुम्बुल तौकीर खान जेव्हा ‘बिग बॉस 16’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली, तेव्हा तिच्या खासगी आयुष्याविषयी बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांसमोर आल्या. नुकतंच सुम्बुलच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. वडिलांच्या लग्नाचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर ईदच्या मुहूर्तावर सुम्बुलच्या वडिलांनी दुसरी पत्नी आणि दोन्ही मुलींसोबतचा फोटो शेअर केला होता. आता नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान सुम्बुलने तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणाली सुम्बुल?

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने इन्स्टाग्रामवर सुम्बुलचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या कुटुंबाबद्दल आणि सावत्र आईबद्दल बोलताना दिसतेय. पापाराझींनी तिला विचारलं की, घरात नवीन आई आल्यानंतर कसं वाटतंय? यावर उत्तर देताना सुम्बुल म्हणाली, “माझे कुटुंबीय आधीसुद्धा खुश होते आणि आता आणखी जास्त खुश झाले आहेत. माझ्याकडे नॉर्मल फॅमिली असल्याचं पाहून मला खूप बरं वाटतंय. आता आमचं कुटुंब पहिल्यासारखं पूर्ण झालं आहे.”

सावत्र बहिणीबद्दल काय म्हणाली?

सावत्र बहिणीसोबत कसं नातं आहे असा प्रश्न विचारला असता सुम्बुल पुढे म्हणाली, “आता मला आणखी एक छोटी बहीण आहे, जी मला खूप त्रास देते. मात्र ती खूप गोड आहे. तिच्यासोबत वेळ घालवायला मला खूप आवडतं.” तौकीर खान यांच्या दुसऱ्या लग्नासाठी फक्त जवळच्या कुटुंबीयांनाच आमंत्रण देण्यात आलं होतं. अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा निकाह पार पडला.

काही दिवसांपूर्वीच सुम्बुलने तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाविषयीची माहिती दिली होती. बऱ्याच प्रयत्नांनंतर तिने दुसऱ्या लग्नासाठी वडिलांचा होकार मिळवला होता. एका मुलाखतीत तौकिर खान म्हणाले, “माझ्या दोघी मुली गेल्या काही वर्षांपासून दुसऱ्या लग्नासाठी माझ्या मागे लागल्या होत्या. अखेर माझ्या मोठ्या भावंडांनी आणि माझ्या मुलींनी या लग्नासाठी होकार मिळवला आहे.”

सुम्बुलच्या नव्या आईचं नाव निलोफर आहे आणि त्यांचा याआधी घटस्फोट झाला होता. निलोफर यांना दोन-अडीच वर्षांची मुलगी आहे. सुम्बुल पाच वर्षांची असतानाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. आता तिच्या आईशी कोणताच संपर्क नाही. सुम्बुल आणि तिच्या बहिणीला वडिलांनीच लहानाचं मोठं केलं आहे. वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे आईसोबतच छोटी बहीणसुद्धा भेटत असल्याचा आनंद तिने व्यक्त केला आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.