Indian Idol 12 | पवनदीप-आशिषला कोरोना, आता सवाई भटची प्रकृती ढासळली, मध्यातच सोडला शो!

लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘इंडियन आयडॉल’ सीझन 12च्या (Indian Idol 12) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. शोचा सर्वात लोकप्रिय स्पर्धक सवाई भट (Sawai Bhatt) पुढच्या आठवड्यात देखील शोमध्ये दिसणार नाहीय.

Indian Idol 12 | पवनदीप-आशिषला कोरोना, आता सवाई भटची प्रकृती ढासळली, मध्यातच सोडला शो!
सवाई भट्ट
Harshada Bhirvandekar

|

Apr 19, 2021 | 12:21 PM

मुंबई : लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘इंडियन आयडॉल’ सीझन 12च्या (Indian Idol 12) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. शोचा सर्वात लोकप्रिय स्पर्धक सवाई भट (Sawai Bhatt) पुढच्या आठवड्यात देखील शोमध्ये दिसणार नाहीय. याचे कारण अचानक त्याची तब्येत बिघडली असल्याचे बोलले जात आहे. या आठवड्यात योगगुरू बाबा रामदेव प्रमुख अतिथी म्हणून इंडियन आयडॉलच्या मंचावर उपस्थिती झाले होते, पण या भागात सवाई भट त्यांच्यासमोर गाताना दिसला नाही (Indian Idol 12 contestant sawai bhatt quit episode due to health issue).

शनिवारचा भाग पाहिल्यानंतर सर्वांच्या मनात असा प्रश्न उपस्थित झाला होता की, पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) नंतर आता सवाई भट देखील कोरोना व्हायरसला बळी पडलेला नाही ना? पण आता शोच्या निर्मात्यांनी या प्रश्नांची उत्तरे दिले आहेत.

पुन्हा एकदा अनुभवता येणार सवाईच्या गाण्यांची जादू…

टीव्ही 9 नेटवर्कला मिळालेल्या विशेष माहितीनुसार, स्पर्धक सवाई भट याची प्रकृती अचानक बिघडली होती आणि त्या कारणामुळे त्याला बाबा रामदेव यांची उपस्थिती असलेला विशेष भाग शूट करता आला नाही. तथापि, आता सवाई एकदम ठीक आहे. पुढील आठवड्यात अर्थात शनिवार व रविवारच्या भागात ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा विशेष अतिथी म्हणून दिसणार आहेत. जयाप्रदा यांचा हा एपिसोड शूट झाला असून, यामध्ये पुन्हा एकदा सवाई भट आपल्या गाण्याची जादू पसरवताना दिसणार आहे (Indian Idol 12 contestant sawai bhatt quit episode due to health issue).

गायक-स्पर्धक सवाई भट आपल्या शास्त्रीय गाण्यांमुळे देशाभरातील लोकांची मने जिंकत आहेत. शोमध्ये अतिथी म्हणून आलेल्या ज्येष्ठ कलाकारांनीही त्याच्या या प्रतिभेची प्रशंसा केली आणि त्याचे खूप कौतुक केले आहे. अशा परिस्थितीत सवाई भट यांची अचानक अनुपस्थिती त्याच्या चाहत्यांसाठी चिंतेचा विषय बनली. सवाई कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी बर्‍याच सोशल मीडियावर व्हायरलही झाली होती. मात्र, त्यामागील सत्य आता समोर आले आहे.

शुटींगवर निर्बंध

सध्या कोरोनामुळे महाराष्ट्रात 15 दिवसांच्या लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे सर्व शुटींग थांबल्या आहेत. काही कार्यक्रम शूट करण्यासाठी मुंबईहून गोव्याला रवाना झाले आहेत, पण इंडियन आयडॉलसारख्या रिअॅलिटी शोने पुढील आठवड्यातील शूट आधीच केले आहे, त्यामुळे प्रेक्षकांची निराश होणार नाहीय. त्याचवेळी शोचे स्पर्धक पवनदीप आणि आशिषबद्दल बोलायचे, तर आता या दोघांचाही कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तथापि, हे दोघेही या कार्यक्रमात सध्या दिसणार नाहीत, कारण शूटिंग आधीच झाली होती आणि त्यावेळी दोघेही कोरोना पॉझिटिव्ह होते.

(Indian Idol 12 contestant sawai bhatt quit episode due to health issue)

हेही वाचा :

Prabhas | मृत्युच्या दारी असलेल्या चाहत्याची शेवटची इच्छा, शुटींग सोडून प्रभास पोहोचला भेटीला!

PHOTO | कोरोनाला हरवून ‘लव्हबर्ड्स’ रणबीर-आलिया मालदीवला रवाना!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें