29 वर्षाच्या अभिनेत्यासोबत 53 वर्षीय तब्बूचा किसिंग सीन; चित्रपटातील ही जोडी पाहून सर्वांनाच वाटलं आश्चर्य
एका 29 वर्षीय अभिनेत्याने 53 वर्षाच्या अभिनेत्रीसोबत एका वेब सिरीजमध्ये किसिंग सीन दिलेत. या सीन्सची बरीच चर्चाही झाली होती. तसेच तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव त्या अभिनेत्याने शेअर केला आहे.

बॉलीवूडमध्ये असे अनके चित्रपट किंवा सीरिज आहेत ज्यात कमी अभिनेते किंवा अभिनेत्रींनी त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या मोठ्या कलाकारांसोबत रोमान्स केला आहे. काहींची जोडी हीट झाली तर काहींच्या जोडीला ट्रोल करण्यात आलं. पडद्यावर काही कलाकरांनी त्यांच्या खूप लहान अभिनेत्रींसोबत रोमान्स आणि इंटिमेट सीन्स केले. बऱ्याचदा स्टार्स पडद्यावर असे सीन्स करताना नियंत्रणही गमावतात. विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार अशी अनेक नावे आहेत ज्यांनी त्यांच्यापेक्षा लहान नायिकांसोबत स्क्रीन शेअर केली. पण एक असा अभिनेता आहे ज्याने त्याच्यापेक्षा 53 वर्षांच्या अभिनेत्री तब्बूसोबत रोमान्स केला आहे, इंटिमेट सीन्स दिले आहेत आणि त्यांचे हे सीन्स खूप व्हायरल झाले आहेत.
अभिनेत्याचे 53 वर्षीय अभिनेत्रीसोबत किसिंग सीनची चर्चा
हा अभिनेता म्हणजे ईशान खट्टर आहे. तो ‘मॅन ऑफ द अवर’, ‘द रॉयल्स’, ‘होमबाउंड’, ‘बियाँड द क्लाउड्स’ या चित्रपटांमुळे चर्चेत राहिला. ईशान चित्रपटांसोबतच ओटीटीवरही काम करत आहे आणि लोक त्याला पसंतही करत आहेत. सर्वांनाच माहित आहे की ईशान हा बॉलिवूड कुटुंबातील आहे. त्याची आई, वडील आणि भाऊ हे सर्व चित्रपटसृष्टीतील मोठी नावं आहेत.
दोघांमधील केमिस्ट्रीचे खूप कौतुक झाले
‘अ सूटेबल बॉय’ या त्याच्या पहिल्या वेब सिरीजमुळे तो चर्चेत आला. या मालिकेत त्याने त्याच्यापेक्षा 24 वर्षांनी मोठ्या असलेल्या तब्बूसोबत इंटिमेट आणि बोल्ड सीन्स दिले. वयाने मोठी असूनही, दोघांमधील केमिस्ट्रीचे खूप कौतुक झाले.
‘तब्बू आणि मी एक परिपूर्ण जोडी होतो’
एका मुलाखतीत ईशानने तब्बूसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. तो म्हणाला, ‘तब्बू आणि मी एक परिपूर्ण जोडी होतो आणि याचे श्रेय कथेच्या उत्कृष्ट लेखनाला जाते. जर आम्हाला इतर कोणत्याही पटकथेत कास्ट केले असते, ज्यामध्ये वयाचा फरक दुर्लक्षित केला गेला असता, तर ते कदाचित विचित्र वाटले असते. पण ‘अ सूटेबल बॉय’च्या पटकथेने आमच्या कामाला पाठिंबा दिला, ज्यामुळे सर्वकाही नैसर्गिक आणि योग्य वाटले.’
View this post on Instagram
तब्बूसोबत काम करणे हा त्याच्यासाठी एक मजेशीर अनुभव असल्याचं अभिनेत्याने म्हटलं
तब्बूसोबत काम करणे हा त्याच्यासाठी एक मजेशीर अनुभव असल्याचं त्याने म्हटलं. ईशान म्हणाला, ‘मी कधीही नर्व्हस झालो नाही. आमच्यातील इंटिमेट सीन्ससाठी आम्हाला कोणतीही विशेष तयारी करावी लागली नाही. ती सेटवर खूप मजेदार गोष्टी बोलत असे, जसे की – ‘जेवणात काय खायचे आहे?’ किंवा ‘त्याने कसा डोळा मारला वैगरे, ती खूप खोडकर आहे, अगदी लहान मुलीसारखी. पण कॅमेरा फिरला की ती लगेचच त्या पात्रात शिरायची.’ ईशानने सांगितले होते की तिच्यासोबत शूट करताना आपण न बोलताही एकमेकांशी संवाद साधू शकतो. असे वाटले की आमचे डोळे एकमेकांशी बोलत आहेत.
तिच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या तब्बूने या मालिकेत एका वेश्येची भूमिकाही साकारली आहे. ‘अ सूटेबल बॉय’ या वेब सिरीजमध्ये ती या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर इशान आणि तब्बूच्या रोमँटिक दृश्यांनी प्रेक्षकांनाही आश्चर्य वाटलं. या मालिकेत अभिनेत्रीचे बरेच इंटिमेट सीन्स आहेत.
ही सीरिज ऑक्टोबर 2023 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. तब्बू आणि ईशान व्यतिरिक्त, राम कपूर, नमिता दास, रणदीप हुड्डा, रणवीर शोरे आणि विजय वर्मा यांसारख्या कलाकारांनीही यात काम केले होते. त्याच वेळी मीरा नायर तिच्या दिग्दर्शिका होत्या.
