ही सरळ सरळ गुन्हेगारी….30 लाख कुत्रे मारण्याच्या निर्णयावर अभिनेत्री जान्हवी कपूर संतापली
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरला मोरोक्कोमध्ये 30 लाख कुत्र्यांना मारल्याची बातमी कळताच ती संतापली आहे. तिने याबाबत आपला विरोध दर्शवला आहे. एवढंच नाही तर तिने याबाबत एक पोस्टही केली आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरचे कुत्र्यांवरचे प्रेम सर्वांना माहितच आहे. जानव्ही कपूरही अतिशय श्वानप्रेमी असून तिच्याकडे बरेच प्रकारचे कुत्री आहे. ती त्यांच्यावर प्रचंड प्रेम करते. पण जेव्हा जान्हवीला मोरोक्कोमध्ये 30 लाख कुत्र्यांना मारल्याची बातमी कळली तेव्हा तिचे मन पिळवटून निघाले. एका रिपोर्टनुसार मोरोक्कोमध्ये 30 लाखांहून अधिक कुत्र्यांना मारण्याची योजना आखण्यात आली आहे. हे 2030 च्या फुटबॉल विश्वचषकासाठी केले जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
ही बातमी जेव्हा जान्हवीला समजली तेव्हा मात्र तिने याबाबत विरोध दर्शवत पोस्ट केली आहे. मोरोक्कोच्या अॅनिमल वेलफेयर ग्रुप्सने देखील याविरोधात आवाज उठवल्याचे म्हटंलं जात आहे. आता जान्हवीनेही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तिने कुत्र्यांचा एक फोटो पोस्ट करत तिचं मत व्यक्त केलं आहे.
30 लाख कुत्र्यांच्या मृत्यूच्या बातमीवर जान्हवी काय म्हणाली?
जान्हवी कपूरने मोरोक्कोमध्ये 30 लाख कुत्र्यांना मारण्याच्या योजनेला विरोध केला आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले, “हे खरे असू शकत नाही. भटक्या प्राण्यांचे पुनर्वसन करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्या सर्वांना मारून “स्वच्छता” करत आहात का? ही गुन्हेगारी.” असं लिहित तिने विरोध दर्शवला आहे.
- Janhvi Kapoor Post
30 लाख कुत्रे का मारले जातील?
स्पेन आणि पोर्तुगालसह मोरोक्को 2030 फुटबॉल विश्वचषक आयोजित करणार आहे. जगातील सर्वात लोकप्रिय खेळाच्या विश्वचषकासाठी मोरोक्को मोठ्या प्रमाणात तयारी करणार आहे आणि त्यासाठी ते आपले रस्ते कुत्र्यांपासून मुक्त करू इच्छित आहे. या कार्यक्रमासाठी मोरोक्कोमध्ये 30 लाख कुत्र्यांना मारले जातील अशी माहिती समोर येत आहे. मोरोक्कोच्या या निर्णयाचा जगभरातून विरोध केला जात झाला.
View this post on Instagram
जान्हवी कपूरच्या कामाबाबत
जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती तिच्या आगामी ‘परम सुंदरी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. ‘परम सुंदरी’ हा चित्रपट 29 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले आहे.
