AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Deverakonda: काय? विजय देवरकोंडा विवाहित? जान्हवी कपूरने केला खुलासा

जान्हवीने केली विजय देवरकोंडाची पोलखोल? रिलेशनशिप स्टेटसचा केला खुलासा

Vijay Deverakonda: काय? विजय देवरकोंडा विवाहित? जान्हवी कपूरने केला खुलासा
Vijay Deverakonda and Janhvi KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 27, 2022 | 7:49 PM
Share

मुंबई- अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजय देवरकोंडाच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला. विजय आणि रश्मिका मंदाना डेट करत आहेत, अशी चर्चा गेल्या काही वर्षांपासून आहे. मात्र आता जान्हवीने विजयबाबत वेगळीच पोलखोल केली आहे. जान्हवी तिच्या आगामी ‘मिली’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एका मुलाखतीसाठी पोहोचली होती. यावेळी इंडस्ट्रीतील एलिजिबल बॅचलर्सबद्दल बोलताना विजयला ती चक्क ‘प्रॅक्टिकल मॅरीड’ आहे असं म्हणाली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

विजय देवरकोंडा किंवा रश्मिका मंदाना कधीच त्यांच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले नाही. आम्ही दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहोत, असंच ते म्हणाले. मात्र काही दिवसांपूर्वी या दोघांना मालदीवमध्ये एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेताना पाहिलं गेलं. तेव्हापासून पुन्हा एकदा या दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली.

बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीला प्रश्न विचारण्यात आला की, तिच्या स्वयंवरमध्ये इंडस्ट्रीतील कोणत्या तीन जणांना बोलवायला आवडेल? यावर उत्तर देताना आधी तिने आदित्य रॉय कपूरचं नाव घेतलं. मात्र सगळेच विवाहित आहेत, असं म्हणत तिने टाळलं. मुलाखत घेणाऱ्याने जेव्हा विजयचं नाव घेतलं, तेव्हा जान्हवी म्हणाली, “विजय देवरकोंडा तर प्रॅक्टिकली मॅरीड आहे ना.”

जान्हवीच्या या प्रतिक्रियेमुळे विजय आणि रश्मिका खरंच एकमेकांना डेट करत आहेत, असा विश्वास नेटकऱ्यांना वाटू लागला. जान्हवी अशी मस्करी करणार नाही, असं एकाने म्हटलं. तर ती कशाला खोटं बोलणार, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

विजय आणि रश्मिकाने ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. या दोघांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. नुकतंच या दोघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. विजयने ‘लायगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. तर रश्मिकाने ‘गुडबाय’ या चित्रपटातून इंडस्ट्रीत एण्ट्री केली.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.