AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | जावेद अख्तर संतापले, पीएम मोदी आणि सीएम योगी यांनी इस्लाम स्वीकारावा म्हणणाऱ्याला थेट म्हटले, तुझ्या कुटुंबियांनी अजूनही

जावेद अख्तर हे कायमच चर्चेत असतात. जावेद अख्तर आणि कंगना राणावत यांच्यामधील वाद तर सर्वांनाच माहिती आहे. जावेद अख्तर आणि जावेद अख्तर यांच्यामधील वाद हा थेट कोर्टात जाऊन पोहचला आहे. जावेद अख्तर हे सोशल मीडियावरही चांगली सक्रिय दिसतात.

Video | जावेद अख्तर संतापले, पीएम मोदी आणि सीएम योगी यांनी इस्लाम स्वीकारावा म्हणणाऱ्याला थेट म्हटले, तुझ्या कुटुंबियांनी अजूनही
| Updated on: Jul 07, 2023 | 2:33 PM
Share

मुंबई : जमातचे मौलाना तौकीर अहमदचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसलाय. तौकीर अहमद (Tauqeer Ahmed) याने एक अत्यंत मोठी मागणी केल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर आता थेट जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी मौलाना तौकीर अहमदचा चांगलाच क्लास लावल्याचे पोस्टमध्ये दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ (Video) पाहून मौलाना तौकीर अहमद याच्यावर टिका केली आहे. अनेकांनी तर थेट हा मौलाना तौकीर अहमद हा पागल असल्याचे देखील म्हटले आहे. बऱ्याच लोकांनी कमेंट करत याच्यावर गुन्हे दाखल करण्याचीही मागणी केलीये.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मौलाना तौकीर अहमद हा थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या दोघांनी इस्लाम धर्म स्वीकारला पाहिजे असे म्हटले असून त्याने म्हटले की, या दोघांनी जर इस्लाम धर्म स्वीकारला तर अनेक समस्या कमी होतील आणि परिस्थितीमध्ये बदल होईल.

इतकेच नाही तर पुढे तौकीर अहमद म्हणाला की, 2014 नुसार देशामध्ये 20 लाख मुसलमान आहेत आणि आता संख्या वाढत आहे. यामुळे मोदी आणि योगी यांनीही इस्लाम धर्म स्वीकारला पाहिजे. मौलाना तौकीर अहमदच्या व्हिडीओवर कमेंट करत जावेद अख्तर म्हणाले की, हा बुद्धिहीन जोकर कोण आहे? याच्या कुटुंबीयांनी याला अजून पागल खाण्यामध्ये का टाकले नाहीये.

लोक सतत तौकीर अहमद याच्या व्हिडीओवर कमेंट करत त्याच्यावर टिका करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये बरेच दावे करताना देखील तौकीर अहमद हा दिसल आहे. जावेद अख्तर यांनी थेट या तौकीर अहमद याला जोकर म्हटले आहे. सध्या तौकीर अहमद याचा व्हिडीओ चर्चेचा विषय हा नक्कीच ठरला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर 2020 मध्ये कंगना राणावत हिने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांच्या नावाचा उल्लेख कंगना राणावत हिने केला होता. जावेद अख्तर यांनी मला हृतिक रोशनची माफी मागण्याचा सल्ला दिला होता. असे कंगना म्हणाली होती. यानंतर कंगना आणि जावेद अख्तर यांच्यामध्ये सतत वाद बघायला मिळतोय. यांचा वाद थेट कोर्टात पोहचलाय.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?