
Aishwarya Rai and Mother in Law Jaya Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन बॉलिवूडचे सर्वात चर्चीत आणि पॉव्हरफूल कपल आहेत. 2007 मध्ये दोघांनी लग्न केलं. आज ऐश्वर्या आणि अभिषेक लेक आराध्या हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहेत, पण काही महिन्यांपूर्वी ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. लवकरच ऐश्वर्या आणि अभिषेक विभक्त होतील अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण यावर बच्चन कुटुंबातील कोणीच प्रतिक्रिया दिली नाही. आता जाहिरात दिग्दर्शक प्रल्हाद कक्कड यांनी या अफवांमागील सत्य उघड केलं आणि ऐश्वर्या बच्चन कुटुंबाचं घर सोडून तिच्या आईच्या घरी का राहते हे देखील स्पष्ट केलं आहे.
ऐश्वर्या राय हिच्याबद्दल बोलताना प्रल्हाद कक्कड यांनी सांगितलं, ऐश्वर्या मॉडेलिंग करायची तेव्हापासून तिला ओळखत आहे. ऐश्वर्या ज्या बिल्डिंगमध्ये राहायची त्याचं बिल्डिंगमध्ये मी राहायचो… म्हणून ऐश्वर्या हिच्याबद्दल अनेक गोष्टी माहिती आहेत… यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटावर देखील प्रल्हाद कक्कड यांनी मौन सोडलं.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत प्रल्हाद कक्कड यांनी इंडस्ट्रीमधील अनेक सत्य उघड केले आहेत. प्रल्हाद कक्कड म्हणाले, ‘ऐश्वर्या हिने कधी तिच्या आईचं घर सोडलंच नव्हतं… लग्नानंतर देखील ती तिच्या आईच्या घरातून दुसऱ्या घरात शिफ्ट झाली नाही… मला नाही वाटत चर्चांमध्ये काही तथ्य असेल. ऐश्वर्या तिच्या आईच्या घरात किती वेळ असते मला माहिती आहे…’
‘आईच्या राहण्याचं तिच्याकडे एक ठोस कारण आहे आणि ते म्हणजे ऐश्वर्याच्या आईची प्रकृती… म्हणून ऐश्वर्या मुलीला शाळेत सोडते, त्यानंतर आईकडे जाते. मुलीची शाळा सुटल्यानंतर ती घरी येते. आराध्याची सुट्टी असेल तेव्हा ऐश्वर्या आईला घेवून घरी जाते…’ असं देखील प्रल्हाद कक्कड म्हणाले.
जेव्हा प्रल्हादला ऐश्वर्या आणि सासू जया बच्चन यांच्यातील मतभेदांबद्दल विचारण्यात आलं तेव्हा प्रल्हाद म्हणाले, “मग काय? ती अजूनही त्या घराची सून आहे. ती अजूनही घर चालवते. सर्व म्हणतात की, अभिषेक याला सोडून ऐश्वर्या तिच्या आईकडे राहते… पण सत्य असं आहे की, ती फक्त सकाळी आईला भेटण्यासाठी येते. रविवारी मुलीला सुट्टी असेल तर की आईकडे येत नाही.. यामध्ये कोणती मोठी गोष्ट आहे…’ ऐश्वर्या कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.