AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाईफ जॅकेटशिवाय समुद्रात मारली उडी? प्रसिद्ध गायकाचा शेवटचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्रसिद्ध गायक लाईव्ह जॅकेटशिवाय समुद्रात उडी मारताना दिसत आहे. गायकाचा शेवटचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. गायकाच्या पत्नीची देखील रडून - रडून वाईट अवस्था झाली आहे...

लाईफ जॅकेटशिवाय समुद्रात मारली उडी? प्रसिद्ध गायकाचा शेवटचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
फाईल फोटो
| Updated on: Sep 20, 2025 | 1:00 PM
Share

Zubeen Garg: प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक झुबिन गर्ग याचं अचानक निधन झालं आहे. ज्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. तर गायकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झुबिन गर्गचा मृत्यू झाला. झुबिनने लाईफ जॅकेटशिवाय समुद्रात उडी मारल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ झुबिन गर्गच्या मृत्यूच्या काही क्षण आधी काढण्यात आला असल्याचं म्हटलं जात आहे.

गायक समुद्रात बुडत आहे पाहताच पोलिसांनी गायकाला बाहेर काढलं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. झुबिन याचं वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं आहे. गायकाचा शेवटचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. अनेकांना व्हिडीओवर कमेंट करत भावना व्यक्त केल्या आहेत.

झुबिन गर्गने लाईफ जॅकेट नसताना समुद्रात उडी मारल्याचा व्हिडिओ

आता, झुबिन गर्ग समुद्रात उडी मारतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाण्यात मजा करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरचा दावा आहे की झुबिनने सुरुवातीला लाईफ जॅकेट घालून उडी मारली. त्यानंतर तो 1.26 सेकंदात यॉटवर परतला आणि लाईफ जॅकेटशिवाय पुन्हा उडी मारली. पण यावेळी तो जिवंत परत येऊ शकला नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांचे मन दुखावलं आहे.

गायकाच्या पत्नीची देखील रडून – रडून वाईट अवस्था

झुबिन गर्ग याची पत्नी गरिमा सैकिया गर्ग हिला देखील असह्य दुःख झालं आहे. गायकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गायकाच्या पत्नीचा फोटो देखील समोर आला आहे. ज्यामध्ये तिची रडून – रडून वाईट अवस्था झाल्याचं समोर येत आहे.

कोण आहे झुबिन गर्ग याची पत्नी गरिमा सैकिया गर्ग?

गरिमा सैकिया ही एक प्रसिद्ध आसामी पोशाख डिझायनर, सिनेमा निर्माती आणि सर्जनशील व्यावसायिक आहे. तिने आसामी आणि प्रादेशिक सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.