कॅमेऱ्यासमोरच चढला जया बच्चन यांचा पारा, लेकीला सुनावले खडेबोल, लोक हैराण, अत्यंत..
जया बच्चन या कायमच चर्चेत असतात. जया बच्चन यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिली आहेत. जया बच्चन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. जया बच्चन यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर कायमच व्हायरल होताना दिसतात.

मुंबई : जया बच्चन या कायमच चर्चेत असतात. जया बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. जया बच्चन या तशा सोशल मीडियापासून दूर असतात. मात्र, असे असताना देखील जया बच्चन या चर्चेत असतात. कायमच जया बच्चन यांचे फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. काही व्हिडीओनंतर तर थेट जया बच्चन यांच्यावर सडकून टीका देखील केली जाते. अनेकांना जया बच्चन यांचे वागणे अजिबातच आवडत नाही. बऱ्याच व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये जया बच्चन या थेट पापाराझी यांच्यावर रागावताना देखील दिसतात. जया बच्चन या सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
नुकताच आता जया बच्चन, श्वेता बच्चन या नव्याच्या शोमध्ये पोहचल्या होत्या. यावेळी काही गोष्टींवर जाहिरपणे बोलताना जया बच्चन या दिसल्या. मात्र, यावेळी थेट मुलगी श्वेता बच्चन हिच्यावर भडताना जया बच्चन या दिसल्या आहेत. जया बच्चन यांचे हे रूप पाहून लोक चांगलेच हैराण झाले. हेच नाही तर चक्क मुलीला कॅमेऱ्यासमोर बोलताना जया बच्चन या दिल्या.
नव्या नवेली नंदा ही जया बच्चन यांना म्हणाली की, काय वाटतंय इंटरनेटचा परिणाम काय होतो? यावर जया बच्चन या बोलण्यास सुरूवात करतात. मात्र, जया बच्चन यांचे बोलणे सुरू असताच श्वेता बच्चन ही मध्येच बोलते, श्वेता बच्चनचे हे मध्येच बोलणे जया बच्चन यांना अजिबातच आवडत नाही, थेट खडेबोल सुनावताना जया बच्चन या दिसत आहेत.
जया बच्चन या म्हणाल्या की, दुसऱ्यांना बोलण्याची संधी दे. प्रत्येकाचे एखाद्या विषयावर मत वेगवेगळे असून शकते. दुसऱ्याचे पण ऐकले पाहिजे. हे नाही की, नेहमीच तुम्ही तुमचे मांडले पाहिजे. श्वेता दुसऱ्यांच्या मताचा आदर करायला हवा असेही थेट म्हणताना जया बच्चन या दिसल्या. यावर श्वेता म्हणते की, पाॅडकास्टचा अर्थच आहे, आपले आपले मत मांडणे.
यावर जया बच्चन या म्हणतात की, आपले मत मांडणे याचा अर्थ हा नाही होत की, तुम्ही फक्त तुमच्यावरच फोकस ठेवणार. तुम्ही काय विचार करतात, दुसऱ्यांचा विचार पण लक्षात घ्या. थेट कॅमेऱ्यासमोरच श्वेता बच्चन आणि जया बच्चन यांच्यामधील तू तू मैं मैं दिसली आहे. नव्याचा हा शो गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आला आहे.
