जया बच्चन मराठी सिनेमात पहिल्यांदाच काम करणार; सात वर्षानंतर फिल्मी दुनियेत कमबॅक

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) ह्या बर्‍याच वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहेत.

जया बच्चन मराठी सिनेमात पहिल्यांदाच काम करणार; सात वर्षानंतर फिल्मी दुनियेत कमबॅक

मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) ह्या बर्‍याच वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहेत. चाहत्यांनाही अभिनेत्रीला रुपेरी पडद्यावर पाहायचे आहे. आता जया बच्चन यांच्या कमबॅकबद्दल मोठी बातमी पुढे येत आहे. जया बच्चन जवळपास 7 वर्षानंतर अभिनयाच्या दुनियेत पुनरागमन करणार आहेत. विशेष म्हणजे जया बच्चन एका मराठी सिनेमातून कमबॅक करणार आहेत. (Jaya Bachchan will be working in Marathi cinema for the first time; Comeback to the film world after seven years)

जया बच्चन पहिल्यांदाच मराठी सिनेमात काम करणार आहेत. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार करण्यात येत आहे. शेवरी, अनुमति आणि द साइलेंस बीइंग क्रिटिकल या सारखे हिट चित्रपट या पूर्वी गजेंद्र अहिरे यांनी तयार केले आहेत आणि आतापर्यंत त्यांनी जवळपास 50 मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटाचे शूटिंग फक्त 20 दिवसात पूर्ण होईल. जया बच्चन यांनी 2012 मध्ये शेवटी चित्रपटाची शूटिंग केली होती. रितुपर्णो घोष यांचा हा चित्रपट होता या चित्रपटात त्यांच्यासोबत नसीरुद्दीन शाह देखीलसोबत होते मात्र, तो चित्रपट कधी रिलीज होऊ शकलाच नाही. जया बच्चन समाजवादी पार्टीच्या खासदार देखील आहेत.

जया बच्चन यांनी राज्यसभेत बॉलिवूडमधील ड्रग्सच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. “बॉलिवूडला ड्रग्सच्या मुद्द्यावरुन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असं जया बच्चन म्हणाल्या होत्या. जया बच्चन यांच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूड ते राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. “ज्या लोकांनी बॉलिवूड इंडस्ट्रीतून नाव कमवलं आहे. ते आता याला गटार बोलत आहेत. मी याला अजिबात सहमत नाही असे जया बच्चन म्हणाल्या होत्या.

संबंधित बातम्या : 

भूमि पेडणेकरचा स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाज, लेहेंग्याची किंमत ऐकून व्हाल हैराण!

अभिनेता संदीप नाहर आत्महत्येप्रकरणात मोठा ट्विस्ट, सासूविरोधात तक्रार दाखल

‘धाकड’मध्ये बदलला कंगनाचा अवतार, फोटो पाहून चाहतेही घाबरले!

(Jaya Bachchan will be working in Marathi cinema for the first time; Comeback to the film world after seven years)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI