AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा जया यांनी भर स्टेजवर अमिताभ यांच्या गालावरील लिपस्टिकचे डाग पुसले; काय आहे हा किस्सा?

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्तच्या खास केबीसी एपिसोडमध्ये त्यांनी जया बच्चन यांचे अनेक किस्से सांगितले. जया पडद्यावर कितीही मोठ्या सेलिब्रिटी असूदेत पण त्या कायमच एक सामान्य पत्नीसारख्याच वागत असतात. त्याबद्दलचा बिग बींनी एक किस्साही सांगितला आहे.

जेव्हा जया यांनी भर स्टेजवर अमिताभ यांच्या गालावरील लिपस्टिकचे डाग पुसले; काय आहे हा किस्सा?
Jaya Bachchan wiped the lipstick off Amitabh Bachchan cheekImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2025 | 7:55 PM
Share

बॉलिवूडमध्ये तसेच कलाकारांच्या आयुष्यात असे अनेक किस्से घडत असतात ज्यांच्याबद्दल आजही चर्चा केली जाते किंवा कलाकरांच्या ते किस्से कायमच लक्षात राहतात. असाच एक न विसरता येणारा किस्सा घडला होता अमिताभ बच्चन यांच्यासोबत. अमिताभ बच्चन यांनी KBC च्या एका एपिसोडमध्ये हा किस्सा सांगितला आहे. तसेच अमिताभ यांना जया बच्चन यांनी फटकारलंही होतं, त्याबद्दलही बिग बींनी सांगितलं आहे.

जया सामान्या पत्नीप्रमाणेच वागतात 

अमिताभ बच्चन यांचा वाढदिवसानिमित्ताने 11 ऑक्टोबर रोजी कौन बनेगा करोडपती 17 चा एक खास एपिसोड दाखवण्यात आला होता. या विशेष भागात फरहान अख्तर आणि जावेद अख्तर यांनी बिग बी यांचा खास दिवस साजरा केला होता. या खास भागात बिग बींनी जया बच्चन यांच्याबद्दल एक मनोरंजक किस्साही सांगितला आहे. त्यांनी जया या प्रसिद्ध सेलिब्रिटी असल्या तरीदेखील त्या एक सामान्या पत्नीप्रमाणेच वागतात. याबद्दल तो प्रसंग सांगतिला आहे.

जेव्हा जया यांनी बिग बींना फटकारले होते 

शो दरम्यान, फरहानने त्यांना विचारले की त्यांच्यात असा कोणता गुण आहे जो त्याच्या पत्नीला म्हणजे जयाला आवडत नाही. ज्यावर बिग बी म्हणाले, “जया फार विचारपूर्वक अशा अभिनेत्री आहेत. त्यांना कथेने किंवा चित्रपटाने काही फरक पडत नाही. जर तिला काही खास आवडत नसेल तर ती लगेच सांगते.”

‘मेरे अंगने में’ गाण्यावरून झाला होता वाद 

त्यांनी पुढे सागंतिले की , ‘मेरे अंगने में’ या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान, मला वाटले की मी ज्या सर्व महिलांचे वर्णन करत आहे त्या सर्व महिलांसारखे कपडे घालावेत… जसं लहान, जाड, उंच आणि हे गाणे परफॉर्म करावं. चित्रपटाच्या ट्रायल स्क्रीनिंग दरम्यान, जेव्हा गाणे वाजले, तेव्हा देवीजी उठून निघून गेल्या. त्यानंतर तिने मला खूप फटकारलं आणि म्हणाल्या की तू अशी गाणी कशी काय गाऊ शकतोस’

View this post on Instagram

A post shared by @sonytvofficial

“काही महिलांनी कौतुकाने माझ्या गालावर किस केले”

हा किस्सा सांगितल्यानंतर अमिताभ यांनी जया या देखील एका सामान्य पत्नीसारख्या कसं वागतात शकतात याबद्दलचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, ’15 वर्षांनंतर, जेव्हा एका पुरस्कार सोहळ्यात हे गाणे मी सादर करत होतो, तेव्हा आम्ही गीतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांना बोलावले. म्हणजे गाण्यातील बोल प्रमाणे त्यांच्या लूकनुसार महिलांना बोलावले. त्या डान्ससाठी स्टेजवर आल्या आणि काहींनी मला मिठी मारली, काही महिलांनी कौतुकाने माझ्या गालावर किस केले.”

“जया माझ्या गालावरच्या लिपस्टिकचे डाग पुसण्यात व्यस्त होत्या”

त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं की, “त्यानंतर मी जयाला उचलले कारण तेव्हा गाण्याची ओळ होती “गोद में उठा लो, बच्चे का क्या काम है”. त्यांच्यात हातात तेव्हा माईक होता मला वाटल की त्याही काही गाण्याच्या ओळी म्हणतील. पण त्या तर माझ्या गालावरील लिप्स्टिकचे डाग पुसण्यात व्यस्त होत्या. त्यांना बाकी कशाची काळजी नव्हती. त्या फक्त एका सामान्य पत्नीप्रमाणे माझ्या गालावरच्या लिपस्टिकचे डाग पुसत होत्या.” तर बिग बींनी हे किस्से सांगत जयाच्या स्वभावाबद्दल तसेच त्या इतरांसाठी सेलिब्रिटी असल्या तरी देखील त्या त्यांच्यासाठी त्यांच्या सामान्यांप्रमाणे रागवणाऱ्या आणि काळजी घेणाऱ्या पत्नीच आहेत.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.