AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना चित्रपट, ना सीरिज, jiohotstar वर या शोचा दबदबा, धुरंधर 2 देखील मागे टाकलं

ना चित्रपट, ना सीरिज, jiohotstar वर प्रेक्षकांची सर्वात जास्त पंसती या शोला. तुम्ही हा शो कुटुंबासोबत देखील पाहू शकता. धुरंधरला मागे टाकत बनला नंबर -1.

ना चित्रपट, ना सीरिज, jiohotstar वर या शोचा दबदबा, धुरंधर 2 देखील मागे टाकलं
| Updated on: Jun 29, 2026 | 12:37 PM
Share

OTT प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत असतात. मात्र, यावेळी जिओहॉटस्टारवरील ट्रेंडिंग यादीत एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. मोठ्या बजेटच्या चित्रपटांनाही मागे टाकत एका कॉमेडी शोने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. हा शो म्हणजे ‘लाफ्टर शेफ 3’. या कार्यक्रमाने भारतातील जिओहॉटस्टारच्या ट्रेंडिंग टॉप-7 यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

‘लाफ्टर शेफ 3’ हा मनोरंजन, विनोद आणि कुकिंगचा अनोखा संगम असलेला शो आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकप्रिय विनोदी कलाकार भारती सिंह आणि शेफ हरपाल सिंह सोखी करत आहेत. स्पर्धकांच्या धमाल मस्ती, विनोदी संवाद आणि भन्नाट कुकिंग चॅलेंजमुळे हा शो सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. त्यामुळेच या आठवड्यात तो जिओहॉटस्टारवरील सर्वाधिक पाहिला जाणारा शो ठरला आहे.

दुसऱ्या क्रमांकावर ‘ठुकरा के मेरा प्यार 2’

ट्रेंडिंग यादीत दुसऱ्या स्थानावर ‘ठुकरा के मेरा प्यार’ या रोमँटिक ड्रामा वेब सिरीजचा दुसरा सीझन आहे. या मालिकेचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून, विशेषतः दुसऱ्या सीझनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘धुरंधर 2’ हा चित्रपट थिएटरनंतर आता ओटीटीवरही लोकप्रिय ठरत आहे. दमदार कथा आणि अॅक्शनमुळे या चित्रपटाने ट्रेंडिंग यादीत तिसरे स्थान मिळवले आहे.

‘अवतार’नेही मिळवले स्थान

हॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट ‘अवतार’ नुकताच जिओहॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. हिंदीसह विविध भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शित होताच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून, ट्रेंडिंग यादीत चौथे स्थान पटकावले आहे.

‘रिसॉर्ट’ पाचव्या क्रमांकावर

दक्षिण भारतीय वेब सिरीज ‘रिसॉर्ट’ पाचव्या स्थानावर आहे. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी संघर्ष करणाऱ्या एका तरुणाची प्रेरणादायी कथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे. कथानक आणि सादरीकरणामुळे या मालिकेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तर ‘धुरंधर’ सातव्या क्रमांकावर

रणवीर सिंह अभिनित ‘धुरंधर’ हा चित्रपट ट्रेंडिंग यादीत सातव्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. ओटीटीवर उपलब्ध झाल्यानंतरही प्रेक्षक त्याला तितक्याच उत्साहाने पाहत आहेत.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर