Johnny Depp: ‘पायरेट्स 6’मधील भूमिकेसाठी जॉनी डेपला तब्बल इतक्या हजार कोटींची ऑफर; किंमत पाहून डोळे विस्फारतील!

2003 मध्ये वॉल्ट डिस्ने पिक्चर्सच्या 'पायरेट्स ऑफ द कॅरेबीयन: द कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल' या चित्रपटात पहिल्यांदा जॉनीने भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला होता.

Johnny Depp: 'पायरेट्स 6'मधील भूमिकेसाठी जॉनी डेपला तब्बल इतक्या हजार कोटींची ऑफर; किंमत पाहून डोळे विस्फारतील!
Johnny Depp
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 28, 2022 | 8:25 AM

‘पायरेट्स ऑफ कॅरेबीयन’ (Pirates Of The Caribbean) या चित्रपटातील हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपने (Johnny Depp) साकारलेली जॅक स्पॅरोची (Jack Sparrow) भूमिका जगभरात गाजली. या चित्रपटाचा सहावा भाग ‘पायरेट्स 6’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यासाठी डिस्नेनं जॉनीला तब्बल 301 दशलक्ष डॉलर्सची ऑफर दिल्याची माहिती आहे. म्हणजेच जॉनी डेपला या चित्रपटातील भूमिकेसाठी जवळपास 2 हजार 355 कोटी रुपये मिळतील. जॉनीची पूर्व पत्नी अँबर हर्डने त्याच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर डिस्नेनं त्याच्या भूमिकेचा पूनर्विचार केला होता. जॉनीच्या हातून ही संधी निसटणार होती. मात्र आता अँबरविरोधातील खटला जिंकल्यानंतर डिस्नेनं माफी म्हणून इतक्या मोठ्या रकमेची ऑफर जॉनीला दिल्याचं कळतंय.

IANS च्या वृत्तानुसार, डिस्ने कंपनीकडून औपचारिकरित्या माफी म्हणून आणि जॉनीला जॅक स्पॅरोच्या भूमिकेसाठी परत येण्याची विनंती म्हणून 301 दशलक्ष डॉलर्स कराराची तयारी करण्यात येत आहे. “डिस्नेला जॉनी डेपसोबतचं त्यांचं नातं पुन्हा पहिल्यासारखं करायचं आहे. म्हणूनच त्यांनी अँबर हर्डविरुद्धच्या मानहानीच्या खटल्यापूर्वी जॉनीशी संपर्क साधला आणि त्याला आणखी एका पायरेट्स चित्रपटात परतण्यात रस आहे का असं विचारलं. कॉर्पोरेटने त्याला खूप मनापासून एक भेटवस्तूसुद्धा पाठवली आहे. परंतु ते त्याला मिळालं की नाही याची मला खात्री नाही. परंतु स्टुडिओने जॅक स्पॅरोबद्दलच्या चित्रपटासाठी आधीच एक ड्राफ्ट तयार केला आहे. त्यामुळे त्यांना खूप आशा आहे की जॉनी त्यांना माफ करेल आणि जॅक स्पॅरोची भूमिका स्वीकारेल” अशी सूत्रांनी माहिती दिली. त्यामुळे आता जॉनी ही ऑफर स्वीकारेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

इन्स्टा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Johnny Depp (@johnnydepp)

2003 मध्ये वॉल्ट डिस्ने पिक्चर्सच्या ‘पायरेट्स ऑफ द कॅरेबीयन: द कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल’ या चित्रपटात पहिल्यांदा जॉनीने भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला होता. या चित्रपटातील कॅप्टन जॅक स्पॅरोच्या भूमिकेसाठी त्याला प्रेक्षक-समीक्षकांकडून दाद मिळाली. इतकंच नव्हे तर अकॅडमी अवॉर्ड, गोल्डन ग्लोब आणि बाफ्ता पुरस्कारासाठी त्याला नामांकनसुद्धा मिळालं होतं.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें