AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लग्नानंतर तू विवाहबाह्य संबंध ठेवू शकतो,मीही ठेवेन,’बॉलिवूड अभिनेत्याचं पहिल्या पत्नीसोबत ओपन मॅरेज

बॉलिवूडच्या एका अभिनेत्याने त्याच्या पहिल्या पत्नीसोबत ओपन मॅरेज केलं होतं. या लग्नात त्यांनी एकमेकांना लग्नानंतर विवाहबाह्य संबंध ठेवण्याची परवानगी दिली होती. मात्र या ओपन मॅरेजचा नक्की काय परिणाम त्याच्या आयुष्यावर झाला हेही या अभिनेत्याने सांगितलं आहे.

'लग्नानंतर तू विवाहबाह्य संबंध ठेवू शकतो,मीही ठेवेन,'बॉलिवूड अभिनेत्याचं पहिल्या पत्नीसोबत ओपन मॅरेज
| Updated on: Jan 29, 2025 | 6:49 PM
Share

बॉलिवूडमधली कलाकारांचे आयुष्य हे ‘ओपन बुक’ असतं. त्यांच्या खासगी आयुष्य हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर येतच असतं. तसेच हे सेलिब्रिटी मुलाखतींमध्येही अनकेदा आपल्या व्यैयक्तिक आयुष्याबद्दल सांगतना दिसतात. मग ते लग्न असो, घटस्फोट असो किंवा मग अफेअर्स असो. चाहत्यांनाही सेलिब्रिटींच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी एक आकर्षण असतं.

अशाच एका अभिनेत्याने एका मुलाखतीत त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगितलं आणि सर्वांना धक्काच बसला. या अभिनेत्याने त्याच्या ओपन मॅरेजबद्दल स्पष्टपणे सांगितलं. या अभिनेत्याचे आपल्या पत्नीसोबत ओपन मॅरेज केलं होतं. या लग्नानुसार दोघेही विवाहबाह्य संबंध ठेऊ शकतात. अभिनेत्याने आणि त्याच्या पत्नीने दोघांनीही एकमेकांना अशी परवानगी दिली होती.

अभिनेत्याचे पत्नीसोबत ओपन मॅरेज 

बॉलिवूड हा अभिनेता म्हणजे कबीर बेदी. कबीर बेदी हे आपल्या आगळ्या वेगळ्या करिअर आणि तितक्याच चढउतार असणाऱ्या वैयक्तिक आयुष्यासाठी ओळखले जातात. नुकतंच त्यांनी आपली पहिली पत्नी ओडिशी नर्तक प्रोतिमा बेदी यांच्यासह केलेल्या ओपन मॅरेजवर भाष्य केलं आहे.

कबीर बेदी आणि प्रोतिमा यांच्या नात्यात प्रेम, आव्हानं, अपारंपारिक निर्णय यांचा समावेश आहे. यामध्ये आपली दोन मुलं पूजा आणि सिद्धार्थ यांचा सांभाळ करण्यासाठी लग्न टिकून राहावं याकरिता ओपन रिलेनशिपची निवड केल्याचा त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले की,”जेव्हा तुम्ही भूतकाळाचा विचार करता, तेव्हा काही खंत असतात. प्रत्येकाला आपण हे थोडं वेगळ्या प्रकारे करु शकलो असतो असं वाटतं,” असं कबीर बेदी यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.

ओपन मॅरेजमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवण्याची परवानगी

कबीर बेदी यांनी खुलासा केला आहे की, “आमच्या मुलांमुळेच आम्ही एकत्र होतो. त्यावेळी आम्हाला वाटलं की, जर आम्हाला एकत्र राहायचं असेल तर ते मुलांसाठी असेल. ओपन मॅरेजनुसार आम्ही ठरवलं होतं की, जर तिला प्रेमसंबंध ठेवायचे असतील आणि मलाही विवाहबाह्य संबंध ठेवायचे असतील तर आम्ही तशी परवानगी एकमेकांना दिली होती. तू तुला जे हवं ते कर आणि मी मला जे हवं ते करेन. आपण एकत्र राहू आणि मुलांना पालक म्हणून एकत्रित सांभाळू. पण ते अपक्षेप्रमाणे झालं नाही. ती फार कठीण गोष्ट होती”. असं म्हणत त्यांनी ओपन मॅरेजमुळे त्यांच्या आयुष्यात काय अडचणी आल्या याबद्दल सांगितलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Radio Nasha (@radionasha)

कबीर बेदी यांचा ओपन मॅरेजचा अनुभव 

मात्र त्यांचं लग्न फार काळापर्यंत टिकलं नाही.पण जरी त्यांचं लग्न तुटलं, तरी त्यांनी त्याचा परिणाम मुलांवर होऊ दिला नाही. ते वेगळे झाले होते, घटस्फोट घेतला होता तरी त्यांनी आई-वडील म्हणून सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्या.

कबीर बेदी म्हणाले “मी तिला माझं घर आणि पाठिंबा दोन्ही दिलं. आम्हाला दोन मुलं असल्याने आम्ही आयुष्यभर मित्र म्हणून राहिलो. आम्हाला मुलांना जाणवून द्यायचं होतं की, जरी पालक एकत्र राहत नसले तरी ते आपले पालक आहेत”.

कबीर बेदी यांनी ओपन मॅरेजसंबंधी मोकळेपणाने ते बोलले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे परस्पर संमती असूनही खुले नातेसंबंध अनेकदा अपयशी ठरतात. कारण कितीही ठरवलं तरी, भावना कुठेतरी गुंतलेल्या असतात. त्यामुळे आपण सहजपणे गोष्टी टाळू शकत नाही. त्यामुळे राग आणि भांडण, एकमेकांबद्दलची असुरक्षितता येतेच. त्यामुळे ओपन मॅरेज ही संकल्पना ऐकायला चांगली वाटत असली तरी ते तेवढं सोपही नसल्याचं कबीर म्हणाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.