‘कच्चा बदाम गर्ल’चं चित्रपटसृष्टीत पदार्पण; साकारणार सीतेची भूमिका

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंजली अरोरा लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. अंजलीला सीतेच्या भूमिकेची ऑफर मिळाली आहे. अभिषेक सिंह दिग्दर्शित चित्रपटात ती सीतेची भूमिका साकारणार आहे.

'कच्चा बदाम गर्ल'चं चित्रपटसृष्टीत पदार्पण; साकारणार सीतेची भूमिका
अंजली अरोराImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 4:53 PM

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांच्या तर साई पल्लवी ही सीतेच्या भूमिकेत आहे. ‘रामायण’ या पौराणिक कथेवर आधारित आणखी एक चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. अभिषेक सिंग या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. तर प्रकाश महोबिया आणि संजय बुंदेला या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटात ‘कच्चा बदाम गर्ल’ अंजली अरोरा सीतेची भूमिका साकारणार आहे. सोशल मीडियावर ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर डान्स करून अंजली रातोरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर तिने कंगना राणौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. आता सीतेच्या भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची घोषणा खुद्द अंजलीने केली आहे.

याविषयी अंजली म्हणाली, “ही भूमिका मिळाल्याबद्दल मी स्वत:ला खूप नशीबवान समजते. सीतेची भूमिका इतकी पवित्र आणि पूजनीय आहे की ती कोणीच नाकारू शकत नाही. पण या भूमिकेसाठी मलाच का निवडलं, हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होते. दिग्दर्शकांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की माझ्यासोबतच त्यांनी इतर काही अभिनेत्रींना शॉर्टलिस्ट केलं होतं. मला असं वाटतं की त्यांनी माझ्यात काहीतरी पाहिलं असेल, ज्यामुळे मी सीतेच्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेन असं त्यांना वाटलं असेल. गेल्या महिन्यात माझी या भूमिकेसाठी निवड झाली आणि तेव्हापासून मी त्यासाठी तयारी करतेय.”

हे सुद्धा वाचा

एकाच वेळी ‘रामायण’ या विषयावर दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने दोघांमध्ये तुलना होणं स्वाभाविक आहे. एकीकडे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे. तर दुसरीकडे अंजली अरोरा ही नवोदित अभिनेत्री असेल. या तुलनेविषयी अंजली पुढे म्हणाली, “मला याची जाणीव आहे की तुलना नक्कीच होणार. तुलनेची भीती कोणाला वाटत नाही? पण जर माझी तुलना बॉलिवूड अभिनेत्रींसोबत होत असेल तर मला आनंदच आहे.”

अंजली ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तिची एक वेगळी प्रतिमा सीतेची भूमिका साकारण्याच्या वाटेत येऊ शकते का, असा प्रश्न विचारला असता तिने उत्तर दिलं, “मी लोकांची मानसिकता बदलू शकत नाही. एक अभिनेत्री म्हणून मला ज्या भूमिकेची ऑफर मिळाली, ती मी पूर्ण मेहनतीने साकारेन. याव्यतिरिक्त मी ट्रोलर्सना नियंत्रित करू शकत नाही. त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे. माझ्या अभिनयाशी माझ्या सोशल मीडिया पेजचं काहीच घेणंदेणं नाही. त्यामुळे माझ्या कामगिरीवर कोणताच परिणाम होणार नाही.”

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.