Tribhanga: काजोलचा ओटीटी डेब्यू, नेटफ्लिक्सवर ‘त्रिभंगा’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा त्रिभंगा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. (Kajol's OTT debut, first film 'Tribhanga' screened on Netflix)

  • Updated On - 5:52 pm, Fri, 15 January 21
Tribhanga: काजोलचा ओटीटी डेब्यू, नेटफ्लिक्सवर 'त्रिभंगा' हा पहिला चित्रपट प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा त्रिभंगा हा चित्रपट आज म्हणजेच 15 जानेवारीला रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला काजोलचा हा पहिला डिजिटल प्रोजेक्ट आहे. चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन रेणुका शहाणे यांनी केलं असून अभिनेता अजय देवगन यांनी हा चित्रपट प्रोड्युस केला आहे. या चित्रपटात तीन पिढ्यांची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात कुणाल रॉय कपूर आणि कावलजीत सिंगसुद्धा महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.
एकाच कुटुंबातील तीन स्त्रियांची ही गोष्ट आहे. 1980 पासून सुरू होणारी ही गोष्ट वर्तमानापर्यंत येते. या चित्रपटात मिथिला पालकर आणि तन्वी आझमी सारखे तरुण कलाकारसुद्धा आहेत. तर काजोल यामध्ये ओडिसी डान्सरची भूमिका साकारत आहे. यापूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता, ज्यात काजोलनं तिन्ही महिलांबद्दल सांगितलं होतं.

आता या चित्रपटाविषयी लोकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. लोकांना हा चित्रपट खूपच आवडला दिसतोय. लोक काजोलच्या अभिनयाचं मोठ्या प्रमाणाच कौतुक करत आहेत.लोक ट्विटरवर चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देत आहेत आणि काजोलची खूप स्तुती करत आहेत. या ट्विटवरुन लोकांनाही या चित्रपटाची कथा आवडली असल्याचं दिसतंय.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI