AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना रणौत करणार राहुल गांधींशी लग्न? अभिनेत्रीनेच दिली थेट प्रतिक्रिया…

सोशल मीडियावर कंगना रणौत आणि राहुल गांधी यांच्या लग्नाचे एक मीम्स व्हायरल झाले होते. आता कंगनाने या मीम्सवर थेट प्रतिक्रिया दिली आहे. ती नेमकं काय म्हणाली जाणून घ्या...

कंगना रणौत करणार राहुल गांधींशी लग्न? अभिनेत्रीनेच दिली थेट प्रतिक्रिया...
कंगना रणौतImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 04, 2026 | 5:01 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असते. सध्या एका वेगळ्याच कारणामुळे कंगना चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते, खासदार राहुल गांधी आणि कंगना रणौत लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. खरंतर ही त्यांच्या लग्नाबाबतची बातमी (Fake News) वेगाने पसरत होती. यावर आता कंगनाने स्वतः मौन सोडले असून ती प्रचंड संतापलेली पाहायला मिळत आहे.

नेमकं प्रकरण काय?

एका मीम पेजने राहुल गांधी आणि कंगना रणौत यांचा फोटो शेअर करत असा दावा केला होता की, जर राहुल गांधी भाजपमध्ये सामील झाले, तर कंगना त्यांच्याशी लग्न करण्यास तयार आहे. हे विधान कंगनाचे असल्याचे भासवून सोशल मीडियावर पसरवले जात होते. या मीम्सने सर्वत्र खळबळ माजली होती. आता कंगनानेच हे मीम्स थेट तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे आणि मीम्स तयार करणाऱ्याला चांगलेच सुनावले आहे.

काय आहे कंगनाची प्रतिक्रिया?

या व्हायरल पोस्टचा स्क्रीनशॉट आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत कंगनाने लिहिले की, “ही फेक न्यूज किती घृणास्पद आहे. राजकारणात महिलांसाठी कोणतीही प्रतिष्ठा उरलेली नाही. अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना लाट वाटली पाहिजे.” कंगनाने या बातमीला ‘दिशाभूल करणारी’ (Misleading) असे संबोधले असून अशा अफवा पसरवणाऱ्यांवर टीका केली आहे.

कंगना रणौतच्या कामाबद्दल

कंगना रणौत सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या कामात व्यस्त आहे. ती लवकरच ‘क्वीन २’ आणि ‘तनु वेड्स मनू ३’  या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तसेच तिच्याकडे आणखी काही चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. कंगना चित्रपटांसोबतच तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी कंगना रणौतचे नाव केंद्रीय मंत्री चिराग पासवानशी जोडले जात होते. मात्र, ते केवळ मित्र-मैत्रीणी असल्याचे कंगाने स्पष्ट केले होते. आता कंगनाचे नाव राहुल गांधींसोबत जोडल्यानंतर ती संतापली होती.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी