उर्मिला सॉफ्ट पॉर्न, तिला तिकीट मिळू शकतं तर… कंगनाचं ते वादग्रस्त विधान व्हायरल; कारण काय?

kangana ranaut | 'उर्मिलाच्या प्रसिद्धीचं कारण अभिनय नाहीतर...', कंगनाचं ते वादग्रस्त विधान, उर्मिला मातोंडकरला म्हणाली 'सॉफ्ट पॉर्न...', अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत हिच्या वक्तव्याची चर्चा...

उर्मिला सॉफ्ट पॉर्न, तिला तिकीट मिळू शकतं तर... कंगनाचं ते वादग्रस्त विधान व्हायरल; कारण काय?
Follow us
| Updated on: Mar 27, 2024 | 11:59 AM

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत हिला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. आता कंगना तिच्या राजकारणाच्या प्रवासाला सुरुवात करत आहे. अभिनेत्रीला उमेदवारी जाहीर झाल्यामुळे कंगनाच्या बाबतीत अनेक जुने मुद्दे नव्याने समोर येत आहेत. कायम वादाचा मुकूट स्वतःच्या डोक्यावर मिरवणाऱ्या कंगनाने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा उल्लेख ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हणून केला होता. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.

कंगना रनौत 2020 मध्ये म्हणाली होती, ‘मी उर्मिला मातोंडकर हिची एक अपमानजनक मुलाखत पाहिली होती. ज्याप्रकारे ती माझ्याबद्दल ती स्वतःचं मत मांडत होती, ज्याप्रकारे ती माझ्याबद्दल बोलत होती… वेग-वेगळे भाव तिच्या चेहऱ्यावर मला दिसत होते…. माझ्या संघर्षावर खिल्ली उडवत होती…. भाजपचं तिकिट मिळवण्यासाठी मी कशाप्रकारे प्रयत्न करतेय यावरुन माझ्यावर निशाणा साधत होती…’

‘भाजपचं तिकिट मिळवणं माझ्यासाठी कठिण नाही… उर्मिला सॉफ्ट पॉर्न स्टार आहे… प्रत्येकाला माहिती आहे, ती तिच्या अभिनयामुळे नाही तर, कोणत्या गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे? सॉफ्ट पॉर्न करण्यासाठीच ना… जर तिला तिकिट मिळू शकतं, तर मला का नाही?’ असं म्हणत कंगनाने उर्मिलावर निशाणा साधला होता.

हे सुद्धा वाचा

उर्मिला मातोंडकर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2019 मध्ये मुंबई – उत्तर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. पण कालांतराने अभिनेत्रीने काँग्रेस पक्षाचा निरोप घेत, शिवसेना पक्षात प्रवेश केला. तेव्हा राजकारणात प्रवेश केल्यामुळे उर्मिला प्रसिद्धी झोतात आल्या होत्या. आता उर्मिला अभिनयापासून दूर असल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

कंगना रनौतची राजकारणात एन्ट्री

कंगना रनौत हिने स्वतःच्या जिद्दीवर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय असते. बॉलिवूडमधील घराणेशाही,  गटबाजीवर देखील अभिनेत्री कायम निशाणा साधत असते. बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींवर निशाणासाधत कंगना वादग्रस्त वक्तव्य करत असते. ज्यामुळे अभिनेत्रीला अडचणींचा देखील सामना करावा लागतो.

कंगना फक्त बॉलिवूड नाहीतर, राजकारणी मंडळींवर देखील वादग्रस्त वक्तव्य करत असते. नेते देखील अभिनेत्रीवर पलटवार करताना दिसतात. अशात आता कंगना निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे बॉलिवूडनंतर अभिनेत्रीचं राजकीय करियर कसं असेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.