Dhakad | भोपाळच्या गुलाबी थंडीत कुल अंदाजात दिसली कंगना, शूटिंग करतानाचे खास फोटो

सतत वादाच्या घेऱ्यात अडकलेली अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये व्यस्त झाली आहे.

Dhakad | भोपाळच्या गुलाबी थंडीत कुल अंदाजात दिसली कंगना, शूटिंग करतानाचे खास फोटो

मुंबई : सतत वादाच्या घेऱ्यात अडकलेली अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये व्यस्त झाली आहे. कंगना रनौतने तिच्या आगामी ‘धाकड’ (Dhakad)  चित्रपटाचे शूटिंग भोपाळमध्ये सुरू केले आहे. यावेळी कंगना ब्लॅक जॅकेट आणि जीन्समध्ये दिसत आहे. यावेळी फोटोंमध्ये धाकड चित्रपटाची टिम देखील दिसत आहे. काल दुपारीच कंगना भोपाळला रवाना झाली होती. कंगनाने नुकताच ए.एल. विजय दिग्दर्शित ‘थलायवी’ या तिच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. (Kangana Ranaut started shooting for Dhakad movie)

थलावली चित्रपट 26 जून 2020ला प्रदर्शित होणार होता.  कोरोनामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, असे म्हटले जात होते. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट डिजिटली प्रदर्शित होणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता चित्रपटगृह सुरू होईपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहायला लागणार आहे.

kangana

कंगनाला आता तिच्या ट्विटर अकाउंटवर 30 लाख लोक फॉलो करत आहेत. कंगनाच्या सतत ट्विटमुळे तिचे अकाउंट चर्चेत राहते. 30 लाख लोक फॉलो करत असल्यचे स्वत : कंगनाने सांगितले आहे आणि यूजर्सचे आभार मानले आहेत. कंगनाने याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे आणि लिहिले आहे की, मी ऑगस्टमध्ये ट्विटरवर आले होते. काही दिवसांपूर्वी मला फॉलो करणारे फक्त हजारांमध्ये होते मात्र, आता ते 30 लाख झाले आहेत. मी ट्विटरवर बराच वेळ घालवला आहे आणि तो मजेदार आहे, सर्वांचे आभार

अलीकडेच दिलजीतने आपल्या सुट्टीचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते, ज्यावर कंगनाने टाकले होते व्वा भावा देशामध्ये आग लावलीस आणि आता सुट्ट्यांचा आनंद घेतोस. याला म्हणतात लोकल क्रांतिकारी, अशा शब्दात कंगनाने दिलजीतवर प्रहार केला होता.

संबंंधित बातम्या : 

बॉलिवूडच्या निशाण्यावर चंद्रमुखी देवी; उर्मिला, तापसी आणि पूजा भट्टकडून समाचार!

जाह्नवी कपूर आणि कार्तिक आर्यनचं ‘खास नातं?’, अफेयर्सच्या चर्चांना उधाण!

(Kangana Ranaut started shooting for Dhakad movie)

Published On - 4:21 pm, Sat, 9 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI