AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगनाची संपत्ती अनेक अभिनेत्यांपेक्षा कैकपट, एका सिनेमाचा चार्ज किती?, वाचा अभिनेत्रीची संपूर्ण डिटेल्स

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने राजकीय विश्वात प्रवेश केला आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथून ती आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. बॉलिवूडीच ही क्वीन किती श्रीमंत आहे आणि एका चित्रपटासाठी ती किती फी घेते ते जाणून घेऊया.

कंगनाची संपत्ती अनेक अभिनेत्यांपेक्षा कैकपट, एका सिनेमाचा चार्ज किती?, वाचा अभिनेत्रीची संपूर्ण डिटेल्स
किती श्रीमंत आहे बॉलिवूडची क्वीन ?Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 27, 2024 | 12:24 PM
Share

बॉलिवूडमध्ये आपल्या कामाने, अभिनयाने छाप पाडणारी कंगना रनौत बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. बॉलिवीडची ही क्वीन आता आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजपने कंगनाला तिकीट दिले आहे. कंगनाचा राजकारणातील प्रवेश हे फार मोठे आश्चर्य नाही. तिने अनेकदा आपले राजकीय विचार मांडले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच तिने राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडणाऱ्या कंगना ही बॉलिवूडची क्वीन म्हणूनही ओळखले जाते.

कंगनाने 2006 मध्ये अनुराग बासूच्या ‘गँगस्टर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत तिने लम्हे, फॅशन, राज 2, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, क्वीन, तनु वेड्स मनू, मणिकर्णिका आणि पंगा यांसारखे अनेक प्रसिद्ध चित्रपट केले आहेत. राजकीय जगतात प्रवेश करणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत किती श्रीमंत आहे हे जाणून घेऊया.

देशातल्या परिस्थितीवर, राजकारणावर खुलेपणाने विचार मांडणाऱ्या कंगना रानौतचा जन्म 23 मार्च 1987 रोजी हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात झाला. तिची आई शाळेत शिक्षिका असून वडील व्यापारी आहेत. तिचं कुटुंब पूर्वीपासून राजकारणाशी जोडले गेले आहे. तिचे आजोबा सरजू सिंह राणौत आमदार होते. मात्र, त्यानंतर कोणीही राजकारणात सक्रिय नव्हते. कंगनाने चंदिगडमधून शिक्षण घेतले. कंगनाने डॉक्टर व्हावे अशी कुटुंबीयांची इच्छा होती, पण कंगनाने AIPMT (आता NEET) परीक्षा दिली नाही.

बॉलीवूडमध्ये एंट्री

कंगनाला आयुष्यात काही वेगळं, भव्यदिव्य करायचं होतं. त्यामुळे वयाच्या 16 व्या वर्षीच ती घरातून पळून काम केले. सुरूवातीला तिला खूप स्ट्रगल करावं लागलं, पण तिचा दमदार अभिनय आणि तिची प्रतिभा याच्या जोरावार तिने अथक मेहनत करून यश मिळवलं. आणि कोणीही गॉडफादर नसताना बॉलिवूडमध्ये तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज ती एका चित्रपटासाठी इतर अनेक नामवंत अभिनेत्रींपेक्षा जास्त फी आकारते.

किती श्रीमंत आहे कंगना ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगनाची एकूण संपत्ती 95 कोटी रुपये आहे. कंगना एका चित्रपटासाठी 15 ते 25 कोटी रुपये मानधन घेते, त्यामुळे तिची गणना बॉलिवूडमधील महागड्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. नुकत्याच आलेल्या थलायवी या चित्रपटासाठी तिने 24 कोटी रुपये घेतले होते. चित्रपटांव्यतिरिक्त कंगना रणौत अनेक ब्रँड्सशीही जोडलेली आहे. ती एका जाहिरातीसाठी 3 ते 3.5 कोटी रुपये घेते. याशिवाय ती एक दिग्दर्शक आणि निर्मातीदेखील आहे, ज्यामुळेही तिचे उत्पन्न वाढले आहे.

हिमाचल प्रदेशातील मनाली येथे कंगानाचा आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत जवळपास 25 कोटी रुपये आहे. याशिवाय तिचा मुंबईत पाच बेडरूमचा एक फ्लॅट आहे, ज्याची किंमत अंदाजे 15 ते 20 कोटी रुपये आहे. याशिवाय पाली हिलमध्ये एक मोठे ऑफीस असून, त्याची किंमत अंदाजे 40 कोटी रुपये आहे.

कार कलेक्शन

कंगना राणौतही लक्झरी कारचीही शौकीन आहे. तिच्याकडे BMW 7-Series, Mercedes Benz GLE SUV, Audi Q3 आणि Mercedes Maybach S-Class सारख्या लक्झरी कार आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.