AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

National Film Awards | वाढदिवसाआधीच मोठी भेट! कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर!

आज (22 मार्च) 67व्या राष्‍ट्रीय फिल्‍म पुरस्‍कारांची (67th National Film Awards) घोषणा करण्यात आली आहे. अभिनेत्री कंगणा रणौतला तिच्या वाढदिवशी मोठं गिफ्ट मिळालं आहे. कंगणाला (Kangana Ranaut) 'मणिकर्णिका' आणि 'पंगा' या सिनेमांसाठी सर्वोतकृष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

National Film Awards | वाढदिवसाआधीच मोठी भेट! कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर!
कंगना रनौत
| Updated on: Mar 22, 2021 | 5:15 PM
Share

मुंबई : आज (22 मार्च) 67व्या राष्‍ट्रीय फिल्‍म पुरस्‍कारांची (67th National Film Awards) घोषणा करण्यात आली आहे. अभिनेत्री कंगणा रणौतला तिच्या वाढदिवशी मोठं गिफ्ट मिळालं आहे. कंगणाला (Kangana Ranaut) ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या सिनेमांसाठी सर्वोतकृष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे (Kangana Ranaut won the National Award for ‘Manikarnika’ and ‘Panga’).

कंगनाला मोठी भेट!

‘67वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळा राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात सोमवारी जल्लोषात पार पडला. या सोहळ्यात अभिनेत्री कंगना रनौत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. पंगा आणि मणिकर्णिका या चित्रपटात तिनं केलेल्या जबरदस्त अभिनयासाठी तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दरम्यान कंगनाचे चाहते सध्या प्रचंड खुश आहेत. सोशल मीडियाद्वारे त्यांनी कंगनावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

कंगनाची कारकीर्द

आपल्या बिंधास्त आणि अनोख्या शैलीमुळे रसिकांबरोबरच समीक्षकांच्याही मनात स्थान मिळविलेल्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये कंगना मोडते. तिला पदार्पणातच ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘गँगस्टर’पासून सुरू झालेला तिच्या या प्रवासात तिने, ‘वो लम्हें’, ‘फॅशन’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘तनू वेड्स मनू’ आदी चित्रपटांत आपला प्रभाव दाखवला. तीन राष्ट्रीय पुरस्कार, चार फिल्मफेअर आणि पद्मश्री अशी तिची समृद्ध मिळकत आहे.

(Kangana Ranaut won the National Award for ‘Manikarnika’ and ‘Panga’)

‘मणिकर्णिका’च्या वेळी कंगनाचा विश्वास!

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत तिच्या अभिनय कौशल्याबरोबरच तिच्या बेधडक वक्तव्यांसाठीही ओळखली जाते. ती कधीही कोणत्याही विषयावर उघडपणे बोलण्यात कचरत नाही. तसेच, ती बर्‍याचदा थेट हल्लाबोल करतानाही दिसते. तिच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर इंडस्ट्रीचा पाठिंबा न मिळाल्याने  कंगना नाराज झाली होती. अशा परिस्थितीत तिने जाहीरपणे आपला संताप माध्यमांसमोर व्यक्त केला होता. यावेळी तिने ‘राष्ट्रीय पुरस्कारां’बद्दल ही वक्तव्य केले होते.

चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकलेल्या कंगना रनौतने या संदर्भात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते की, ‘मणिकर्णिका’ राष्ट्रीय पुरस्कार मिळणे अपेक्षित आहे. पण त्याच वेळी ती म्हणाले होती की, ‘मणिकर्णिका’ ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही, तर राष्ट्रीय पुरस्काराच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले जाईल, असेही तिने म्हटले होते. मात्र, याच चित्रपटासाठी तिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा :

PHOTO | पडद्यावरच्या ‘सोयराबाईं’चा हा ग्लॅमरस अवतार पाहिलात का?

बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा संसाराचा नवा डाव मांडणार; लवकरच करणार दुसरे लग्न!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.