PHOTO | पडद्यावरच्या ‘सोयराबाईं’चा हा ग्लॅमरस अवतार पाहिलात का?

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील ‘सोयरा बाईसाहेब’ म्हणून घराघरांत पोहोचलेली, करिअरच्या सुरुवातीलाच नकारात्मक शेड असलेली भूमिका तितकीच चोख वठवत प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी अभिनेत्री म्हणजेच स्नेहलता तावडे-वसईकर (Actress Snehlata Vasaikar) सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.

1/5

2/5
‘सोयराबाई’ यांची भूमिका अतिशय उत्तम वठवून स्नेहलता यांनी प्रेक्षकांच्या कौतुकाची पावती मिळवली आहे. या भूमिकेसाठी स्नेहलता यांना अभिनयासोबतच स्वत:च्या शरीरयष्टीवरही विशेष मेहनत घ्यावी लागली होती. सध्या मराठी मालिका-चित्रपट विश्वात आपल्या फिटनेससाठी आवडीने मेहनत घेणाऱ्या काही मोजक्याच अभिनेत्री दिसतात. फिटनेस फ्रीक म्हणून ओळखली जाणारी स्नेहलता हे यातलंच एक नाव आहे.

3/5
स्नेहलता अभिनयाबरोबर कौटुंबिक जबाबदाऱ्यासुद्धा लीलया पेलते. त्यांना एक मुलगी असून ती आता पाच वर्षांची आहे. सध्या स्नेहलता त्यांच्या ग्लॅमरस अवतारामुळे खूप चर्चेत आहे. पडद्यावर कठोर वाटणारी स्नेहलता प्रत्यक्षात मात्र वेगळीच आहे. ती नेहमी स्वतःच्या लूक बाबत खूप काळजी घेते.

4/5
सध्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या ऐतिहासिक हिंदी मालिकेत अभिनेत्री स्नेहलता वसईकर ‘गौतमीबाई’ अर्थात मल्हार राव होळकर यांच्या पत्नी व अहिल्याबाईंच्या सासूबाईच्या भूमिकेत दिसत आहे. स्नेहलताची ही दुसरी ऐतिहासिक मालिका आहे. स्नेहलता यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

5/5
अभिनयाबरोबरच स्नेहलता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमी आपले नवनवीन फोटो चाह्त्यांसोबत शेअर करत असते. सध्या तिच्या या फोटोंमध्ये तिचा नवा ग्लॅमरस अवतार दिसून येत आहे. स्नेहलता तावडे-वसईकरच्या या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट आणि लाईक्स करत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI