ड्रग्ज केसमध्ये फसलेल्या अर्जुनसोबत कंगनाची पार्टी, चिडलेल्या प्रेक्षकांची चित्रपटावर बहिष्कार घालण्याची धमकी!

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या मुंबईत आली असून तिच्या आगामी धाकड़ चित्रपटाची तयारी करत आहे.

ड्रग्ज केसमध्ये फसलेल्या अर्जुनसोबत कंगनाची पार्टी, चिडलेल्या प्रेक्षकांची चित्रपटावर बहिष्कार घालण्याची धमकी!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या मुंबईत आली असून तिच्या आगामी धाकड़ चित्रपटाची तयारी करत आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने कंगनाने तिच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. त्यामध्ये धाकड़ चित्रपटाचे दिग्दर्शक रेजी घई, अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि त्याची गर्लफ्रेंड ग्रैबिए उपस्थित होते. अर्जुन रामपालचे नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आले आहे. एनसीबीने त्याच्या घरी छापा टाकला आणि त्याला दोनदा चौकशीसाठी देखील बोलावले होते. (Kangana’s party with Arjun Rampal, who is involved in a drug case)

या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ कंगनाने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. मात्र, हे फोटो आणि व्हिडिओ पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. कारण यामध्ये अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड दिसत आहे. हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना कंगनाने दिग्दर्शक रेजी घई यांचे कौतुक केले आहे. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणावर कंगना नेहमीच व्यक्त होत असते. ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांवर तिने सोशल मिडियावर टिका देखील केली होती. मात्र, आता कंगनाचा अर्जुन रामपालसोबतचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

त्यानंतर कंगनाला आता सोशल मिडियावर ट्रोल केले जात आहे. काही ट्रोलर्स म्हणत आहे की, कंगनाच्या या चित्रपटावर बहिष्कार घालायचा, तर एक ट्रोलर्स म्हणाला की, अर्जुन रामपाल तुमच्यासोबत काय करत आहे? तर दुसरा ट्रोलर्स म्हणतो की, ड्रग्स प्रकरणावर तुम्ही बरीच मते मांडतात आणि तुम्ही ज्यांच्यासोबत पार्टी करत आहात त्यांची चौकशी सुरू आहे आणि तुमची हिम्मत कशी झाली अशा मानसासोबत पार्टी करण्याची आणि फोटो काढण्याची
धाकड़ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर कंगना या चित्रपटात वेगळा स्टाईलमध्ये दिसणार आहे.  या चित्रपटाचे शूटिंग जानेवारीत सुरू होणार आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल देखील कंगनासोबत दिसणार आहे.

संबंधित बातम्या : 

“उर्मिला मातोंडकर अभिनयासाठी नाही सॉफ्ट पॉर्नसाठी परिचित” कंगनाची जीभ घसरली

मी क्षत्रीय, शीर धडावेगळं झालं तरी चालेल, पण ते कधीही झुकणार नाही : कंगना रनौत

(Kangana’s party with Arjun Rampal, who is involved in a drug case)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI