.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्याचं हार्ट अटॅकने निधन; वयाच्या 47 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, शेवटची पोस्ट व्हायरल

प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता दिलीप राज यांच्या निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या 47 व्या वर्षी त्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.

प्रसिद्ध अभिनेत्याचं हार्ट अटॅकने निधन; वयाच्या 47 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, शेवटची पोस्ट व्हायरल
कन्नड अभिनेता दिलीप राजImage Credit source: Instagram
| Updated on: May 13, 2026 | 1:59 PM
Share

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते दिलीप राज यांचं बुधवारी पहाटेच्या सुमारास निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. दिलीप यांचं निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचं समजतंय. ‘एनडीटीव्ही’नं दिलेल्या वृत्तानुसार, हार्ट अटॅक आल्यानंतर दिलीप यांना त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 2007 मध्ये प्रसिद्ध कन्नड अभिनेते पुनित राजकुमारसोबत ‘मिलाना’मध्ये काम केल्यानंतर दिलीपला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याने ‘यू-टर्न’ आणि ‘बॉयफ्रेंड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. दिलीपने निर्माता म्हणूनही काम केलं असून ‘डीआर क्रिएशन्स’च्या बॅनरअंतर्गत त्याने अनेक मालिकांची निर्मिती केली होती.

झी कन्नड मालिका ‘हिटलर कल्याणा’मध्ये मुख्य भूमिका साकारून दिलीप घराघरात पोहोचला होता. अभिनय आणि निर्मितीशिवाय तो रंगभूमीवरही सक्रिय होता. इतकंच नव्हे तर तो डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम करत होता. टेलिव्हिजन इंडस्ट्रीत नाव कमावण्यापूर्वी दिलीपने रंगभूमीवर आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं होतं. नटरंग आणि दृष्टी यांसारख्या प्रसिद्ध थिएटर ग्रुप्समध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. रंगभूमीवर काम करता करता त्याची ओळख टीव्ही अभिनेत्री नंदिताशी झाली आणि तिनेच त्याला टेलिव्हिजन इंडस्ट्रीत आणलं होतं.

‘कंबडा माने’ या मालिकेतून त्याने टेलिव्हिजनवरील प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर लगेचच त्याला ‘जननी’ या लोकप्रिय मालिकेत भूमिका मिळाली. या मालिकेत त्याने दिग्गज अभिनेत्री भारती विष्णुवर्धन यांच्या नातवाची भूमिका साकारली होती. ‘अर्धसत्य’, ‘रंगोली’, ‘कुमकुम भाग्य’, ‘मांगल्य’, ‘मालेबिल्लू’, ‘प्रीतिगागी’ आणि ‘रथसप्तमी’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. दिलीप राजने 24 हून अधिक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करतानाही तो रंगभूमीला विसरला नव्हता.

दिलीप राजच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसह चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. दिलीपच्या निधनानंतर त्याची इन्स्टाग्रामवरील शेवटची पोस्ट चर्चेत आली आहे. 9 जानेवारी रोजी त्याने इन्स्टाग्रामवर शेवटचा फोटो अपलोड केला होता. सोशल मीडियावर तो फारसा सक्रिय नव्हता. या पोस्टमध्ये त्याने एका चित्रपटाचा पोस्ट शेअर केला होता.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर