AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kantara: सगळं ओके, पण ‘कांतारा’ची लव्ह स्टोरी खटकली? ऋषभ शेट्टीचं उत्तर एकदा वाचाच!

'कांतारा'च्या लव्ह स्टोरीवर टीका करणाऱ्यांना ऋषभ-सप्तमीचं उत्तर

Kantara: सगळं ओके, पण 'कांतारा'ची लव्ह स्टोरी खटकली? ऋषभ शेट्टीचं उत्तर एकदा वाचाच!
KantaraImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Nov 07, 2022 | 4:23 PM
Share

मुंबई- ‘कांतारा’ हा मूळ कन्नड चित्रपट सध्या देशभरात गाजतोय. मात्र सुरुवातीला कन्नड वगळता इतर भाषांमध्ये डब करण्याचा दिग्दर्शकाचा मानस अजिबात नव्हता. प्रेक्षकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहिल्यानंतर चित्रपटाच्या टीमकडून इतर भाषांमध्ये डबिंगचा निर्णय घेण्यात आला. अवघ्या 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 350 पेक्षा जास्त कमाई केली आहे. प्रेक्षक-समिक्षकांकडून ‘कांतारा’चं तोंडभरून कौतुक होत असतानाच काही जण त्यात दाखवलेल्या लव्ह-स्टोरीवर टीका करत आहेत. यावर आता खुद्द अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी आणि अभिनेत्री सप्तमी गौडाने उत्तर दिलं आहे.

लीलासारखी (सप्तमीने साकारलेली भूमिका) सुशिक्षित आणि स्वतंत्र विचारांची मुलगी शिवासारख्या (ऋषभने साकारलेली भूमिका) उनाड मुलावर प्रेम करणार नाही, असं मत अनेकांनी नोंदवलं. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यावर बोलताना सप्तमी म्हणाली, “मी स्वत: समाजात अशा प्रेमकथा पाहिल्या आहेत.

तुम्ही काय काम करता आणि कोण आहात याचा विचार प्रेमात केला जात नाही. चित्रपटात दाखवलेली लीला आणि शिवा हे दोघं लहानपणापासून एकमेकांना ओळखतात, एकाच गावात ते दोघं राहिले आहेत, त्यामुळे तेव्हापासून त्यांच्याच ते नातं निर्माण झालंय. ती सुशिक्षित झाल्यानंतर त्यांच्यातील ते नातं बदललं नाही. प्रेम असंच असतं. ते कोणाशीही सहज होऊन जातं.”

चित्रपटातील शिवाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धतही अनेकांना खटकली. त्यावर ऋषभ म्हणाला, “90 च्या दशकातील आणि खेडेगावात घडणारी कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हे सर्व मी माझ्या गावात घडताना पाहिलंय आणि मला तशीच खेडेगावातील प्रेमकहाणी हवी होती. ज्या वातावरणात शिवा लहानाचा मोठा झाला, त्याला प्रेम व्यक्त करण्याची तशीच पद्धत माहीत होती.”

शिवाच्या भूमिकेचा बचाव करताना सप्तमीनेही तिचं मत मांडलं. “शिवा इतर कुठल्याही मुलीसोबत तसा वागत नाही. तो फक्त तिच्यासोबत तसा वागतो. त्याच्या प्रेमाची भाषा तशीच होती. बैलांच्या शर्यतीत भाग घेणाऱ्या व्यक्तीला एखाद्या मुलीशी कसं बोलायचं, हे कसं कळेल. तेच या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे”, असं ती म्हणाली.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.