AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपिलचे चित्रपट फ्लॉप असूनही सुपरस्टार अक्षय कुमार का घेतो त्याचे आशीर्वाद, वाचा कपिलचे कारनामे…

अभिनेता अक्षय कुमारने आपल्या बेलबॉटम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या कार्यक्रमामध्ये गेला होता. त्या कार्यक्रमातील अक्षय कुमारने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याआधीही कपिलने अक्षय आणि आपला एक फोटो शेअर केला होता, त्यानंतर कपिल शर्मा प्रचंड ट्रोल झाला होता.

कपिलचे चित्रपट फ्लॉप असूनही सुपरस्टार अक्षय कुमार का घेतो त्याचे आशीर्वाद, वाचा कपिलचे कारनामे...
आज कपिल शर्माचा वाढदिवस आहेImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 10:50 PM
Share

मुंबईः कपिल शर्मा एक उत्कृष्ट कॉमेडियन असला तरी तो एक उत्तम गायकही आहे. आपल्या कार्यक्रमामध्ये त्याने अनेकदा आपल्या गायिकीची झलक दाखवली आहे, आणि त्याच्या या गायिकेचे प्रेक्षकांनी तोंड भरुन कौतुकही केले आहे. मात्र त्याने आपल्या अभिनयची (Acting) परीक्षाही बघितली आहे, मात्र त्यात तो म्हणावा तेवढा यशस्वी झाला नाही. किस किस से प्यार करुं आणि फिरंगीसारख्या चित्रपटातून (Indian Cinema) त्याने आपल्यातील अभिनय अजमावून बघितला आहे, मात्र त्यात म्हणावा एवढा यशस्वी झाला नाही. फिरंगी चित्रपटासाठी त्याने अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) पावलापाऊल टाकण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यात तो प्लॉप ठरला. या गोष्टीचा खुलासा खुद्द कपिल शर्मानेच केला आहे.

स्टँडअप कॉमेडियन अभिनव बस्सीच्या कार्यक्रमात कपिल शर्मा गेस्ट म्हणून गेला होता. नेटफ्लिक्सच्या या शो मध्ये एका क्षणी अभिनवने त्याचा कसरती करतानाचा फोटो दाखवत त्याला विचारले की, हा कधीचा फोटो आहे तर तेव्हा कपिल म्हणाला की, अक्षय कुमारसारखं सकाळी चार वाजता उठून फॅट पासून फिटपर्यंतच्या प्रवासातला आहे. या चित्रपटासाठी त्याने आपले वजन 72 किलो केले होते, मात्र त्याचा चित्रपट फ्लॉप ठरला आहे. फिरंगीनंतर त्याचे वजन एकदम वाढून 92 किलो झाले होते.

आणि कॅमेरामनलाही अक्षयने सांगितले की..

त्यानंतर कपिल शर्माला पुन्हा एक फोटो दाखवतो, त्यामध्ये अक्षय कुमार कपिल शर्माच्या पायांना स्पर्श करून त्याचा तो आशिर्वाद घेत आहे. त्यानंतर या फोटोमागचे सत्य काय असे जेव्हा कपिल शर्माला विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, मी जेव्हा जेव्हा अक्षय कुमारला भेटतो तेव्हा तेव्हा त्याच्या पायांना स्पर्श करतो, त्याच्या पाया पडतो. त्यानंतर एकदा अक्षय कुमारने त्याला म्हटले की, मलासुद्धा तुझ्या पायांना स्पर्श करून आशिर्वाद घ्यायचा आहे, त्यानंतर त्याने कॅमेरामनला सांगितले की, पाया पडताना आमचा फोटो काढ, म्हणजे कपिल लोकांना सांगू शकेल की, बॉलिवूड का सुपरस्टार कपिलचा आशिर्वाद घेतो. त्यानंतर कपिलने सांगितले की ही गोष्ट मी लोकांना सांगितली तर त्यावर लोकंही विश्वास ठेवतात.

या फोटोमुळे कपिलही झाला होता ट्रोल

त्यानंतर अक्षय कुमार आपल्या बेलबॉटम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये गेला होता, त्यावेळी कपिलने त्याचा आणि अक्षय कुमारचा अक्षय त्याचा आशीर्वाद घेत असल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, आणि तो खूप व्हायरलही झाला होता. त्या फोटोला कपिल शर्माने कॅप्शन दिली होती की, सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता अक्षय कुमार आपल्या नव्या बेलबॉटम चित्रपटासाठई आशीर्वाद घेताना. त्यानंतर अक्षय कुमारच्या चाहत्यांनी कपिल शर्माला ट्रोल केले होते.

विनोदाचा वारसा आई वडिलांकडून

कपिलच्या शोमध्ये त्याला विचारले होते की, हा प्रत्येक वेळेला हा विनोद सुचतो कसा तुला. त्यावेळी त्याने सांगितले की, ही देण माझ्या आई व़डिलांकडून मला मिळाली आहे. त्या दोघांची जेव्हा जेव्हा वाज होत तेव्हा तेव्हा मी त्यांच्या भांडणाची मजा घेतले. तर माझा भाऊ मात्र त्यांच्या दोघांमध्ये हस्तक्षेप करायचा.

संबंधित बातम्या

Bigg Boss 15 Grand Finale : बिग बॉस 15च्या ग्रॅड फिनालेला सेलिब्रिटींची हजेरी, आवडत्या स्पर्धकाला सपोर्ट करण्यासाठी कलाकारांची उपस्थिती

Hrithik Roshan | हृतिक रोशनसोबत हातात हात घालून जाणारी मिस्ट्री गर्ल कोण होती? उत्तर मिळालं!

10 लाख घेत निघाला घरी! निशांत भट्टचा बिग बॉसच्या घरातून निघण्याचा निर्णय चुकला? काय म्हणाला भाईजान

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.