ना जिम, ना डाएट.. कपिल शर्माने 63 दिवसांत घटवलं 11 किलो वजन, फक्त ही एक गोष्ट केली फॉलो
कॉमेडियन कपिल शर्माच्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांनाच चकीत केलं आहे. त्याने 63 दिवसांत 11 किलो वजन कमी केलं आहे. परंतु त्यासाठी त्याने तासनतास जिममध्ये घाम गाळला नाही किंवा विशेष डाएटसुद्धा फॉलो केलं नाही.

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळेच थक्क झाले आहेत. अचूक विनोदाचं टायमिंग आणि दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखला जाणारा कपिल आता त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आला आहे. कपिलने 63 दिवसांत 11 किलो वजन कमी केलं आहे. विशेष म्हणजे यासाठी त्याने कोणताही विशेष डाएट पाळला नाही किंवा तासनतास जिममध्ये घाम गाळला नाही. फराह खान, कंगना राणौत आणि सोनू सूद यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना ट्रेन करणारा फिटनेस ट्रेनर योगेश भटेजाने कपिलच्या ट्रान्सफॉर्मेशनमागचं रहस्य सांगितलं आहे.
कपिलचा 11 किलो वजन कमी करण्याचा प्रवास काही सोपा नव्हता, असं त्याने म्हटलंय. परंतु कडक शिस्त, लाइफस्टाइल, स्मार्ट पद्धत आणि 21-21-21 नियमानुसार त्याने त्याच्या सवयींना नवीन रुप दिलं आणि अतिरिक्त वजन कमी केल्याचं योगेशने स्पष्ट केलं. योगेशने कपिलला त्याच्याच घरी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये रेझिस्टन्स बँड आणि योगा मॅटसारख्या सर्वसामान्य टूल्सचा वापर करण्यात आला होता. नंतर फिटनेसच्या प्रवासात पुढे जिमचे टूल्ससुद्धा समाविष्ट करण्यात आले.
ट्रेनिंगच्या पहिल्या दिवसाबद्दल योगेशने सांगितलं, “पहिल्या दिवसाची कथा खूपच मजेशीर होती. मी त्याला स्ट्रेचिंग करायला सांगितलं होतं. त्याच्या शारीरिक हाचलाची मर्यादित असल्याने स्ट्रेचिंग करतानाही त्याला त्रास जाणवत होता. मी त्याला योग्य वेळी व्यायाम करण्याचा सल्ला दिला आणि आम्ही बेसिकपासून सुरुवात केली. तेव्हा मला समजलं की त्याचं शरीर किती आकडलं होतं, खाण्यापिण्यात कोणतीच शिस्त नव्हती आणि शरीराला एक प्रकारची सूज आली होती.”
View this post on Instagram
कपिलचं वेळापत्रक व्यग्र असल्याने योगेशसमोर बरीच आव्हाने होती. “कपिलवर बऱ्याच गोष्टींची जबाबदारी आहे, त्यामुळे त्याच्या झोपेच्या वेळाही योग्य नव्हत्या. त्याच्या जेवणाचंही निश्चित वेळापत्रक नव्हतं. कोणत्याही वेळी किंवा अवेळी तो जेवायचा. यात कोणतीच शिस्त नव्हती. त्याचा मॅनेजर, त्याची टीम आणि त्याच्या लाइफस्टाइलनुसार सर्व गोष्टींचा समतोल साधण्यात बराच वेळ लागला”, असं योगेशने पुढे स्पष्ट केलं.
योगेशने कपिलच्या डाएटमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले. त्याने त्याला मासे अधिक खाण्याचा सल्ला दिला होता. ज्यामुळे शरीराला प्रोटीन तर मिळतंच, शिवाय कॅलरीज नियंत्रित राहतात. कपिलच्या जेवणात विविध भाज्यांचा समावेश करण्यात आला. कपिलचं वजन आधीही कमी-जास्त होत राहायचं. परंतु आता त्याच्या शरीरयष्टीत काही सकारात्मक बदल झाले आहेत. त्याचं हे ट्रान्सफॉर्मेशन चाहत्यांनाही आवडलं आहे.
