‘हे शोभलं नाही तुला…’ इंग्लंडमधील ज्वेलरी इव्हेंटटमध्ये करीना कपूरचा ‘आयटम सॉंग’वर डान्स, सगळे पाहचत राहिले; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
बॉलिवूडची बेबो करीना कपूर खानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तिने इंग्लंडमधील एका ज्वेलरी इव्हेंटटमध्ये 'आयटम सॉंग'वर डान्स केल्याने नेटकरी, तिचे चाहते मात्र नाराज आहेत. दागिन्यांच्या कार्यक्रमात तिने निवडलेलं गाणं आणि तिचा डान्स यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

एका व्हिडिओमध्ये, करीना कपूर खान बर्मिंगहॅममधील एका कार्यक्रमात स्टेजवर ‘फेव्हिकॉल से’ गाण्यावर तिच्या नृत्याच्या चाली दाखवताना दिसत आहे. काही नेटिझन्सनी गाण्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि विचारले की तिने दागिन्यांच्या कार्यक्रमात आयटम नंबर का केला. एका नेटिझनने टिप्पणी दिली – तिच्याकडे इतर अनेक चांगली गाणी आहेत जी दागिन्यांच्या कार्यक्रमात वाजवता आली असती?
करीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतेच. तसेच तिची चर्चा जास्त होते ती तिच्या लूक अन् फॅशनमुळे. कोणत्याही कार्यक्रमात करीना नेहमीच तिच्या लूक अन् फॅशनने सर्वांवर तिची छाप सोडून जाते. सध्या करीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिने एका इव्हेंटमध्ये चक्क ‘आयटम सॉंग’वर डान्स केला. त्यावरून चाहते मात्र नाराज झाले आहेत.
सिल्वर शिमरी साडीच्या लूकमध्ये करीना दिसत होती खूपच सुंदर
इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे एका ज्वेलरी स्टोअरच्या लाँचिंगला करीना कपूरने हजेरी लावली होती. बेबोने या इव्हेंटचे आणि तिचे अनेक ग्लॅमरस फोटोही शेअर केले होते. इव्हेंटमध्ये करीनाने सिल्वर शिमरी साडी नेसली होती. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती.आणि या कार्यक्रमादरम्यान, करीनाने ‘दबंग 2’ चित्रपटातील तिच्याच हीट गाण्यावर जे की एक आयटम सॉंग आहे ‘फेव्हिकॉल से’. या गाण्यावर तिने डान्स केला.
‘आयटम सॉंग’वर डान्स
बर्मिंगहॅममधील एका कार्यक्रमात करीना कपूर खान स्टेजवर ‘फेव्हिकॉल से’ गाण्यावर तिच्या डान्स मूव्ह करताना दिसत आहे. प्रेक्षकांनी देखील तिच्या या परफॉर्मन्सचा खूप आनंद घेतला.पण करीनाचा या गाण्यावरचा डान्स पाहून सर्वजण एकदम शांत झाले. एकीकडे उपस्थित सर्वजण टाळ्या वाजवून तिच्या डान्सचं कौतुक करत होते तिथेच दुसरीकडे सगळेजण शॉक झाल्यासारखं एकमेकांकडे पाहत होते. मिस मालिनीच्या इंस्टाग्रामवरून करीनाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
गाण्याच्या निवडीवरून उपस्थित केलेले प्रश्न
नेटकऱ्यांनी मात्र करीनाच्या या गाण्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच कमेंट करत प्रश्नही विचारले आहे की तिने दागिन्यांच्या कार्यक्रमात आयटम नंबर का निवडलं असेल. एका नेटिझनने टीका करत म्हटलं की, “तिच्याकडे इतर अनेक चांगली गाणी आहेत जी दागिन्यांच्या कार्यक्रमात वाजवता आली असती?तिने हेच का निवडलं” तर दुसऱ्याने लिहिले “का यार! याची गरज नव्हती” तर तिसऱ्याने कमेंट केली आहे की ‘ या नृत्यासाठी हा योग्य कार्यक्रम नाही. हे अजिबात बरोबर नाही’ तर एकाने लिहिले “हे नवाबच्या पत्नीला शोभत नाही. हे करिनाकडून अपेक्षित नव्हतं” अशा बऱ्याच कमेंट्स आल्या आहेत. एकंदरीतच बेबोच्या गाण्याच्या निवडीसाठी आणि तिने केलेल्या अशा प्रकारच्या डान्ससाठी नेटकरी मात्र तिला ट्रोल करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
करीनासाठी शिट्ट्या वाजल्या
या कार्यक्रमाला चाहत्यांची मोठी गर्दी दिसून आली. करीनावर झालेला प्रेमाचा वर्षाव आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिची प्रचंड लोकप्रियता दर्शवितो. बेबोने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. डान्सबद्दल जरी चाहते किंवा नेटकरी तिच्यावर नाराज असेल तर नेहमीप्रमाणे तिच्या साडीलूकच कौतुकही केलं आहे.
करिनाच्या कामाबद्दल बोलायचं तर…
कामाच्या बाबतीत, करिना शेवटची सुजॉय घोषच्या ‘जाने जान’, रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ आणि हंसल मेहताच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ मध्ये दिसली होती. पुढे, ती दिग्दर्शक मेघना गुलजारच्या आगामी ‘दारा’ चित्रपटात दिसणार आहे. हा एक गुन्हेगारी नाटक आहे ज्यामध्ये ती पृथ्वीराज सुकुमारनसोबत काम करणार आहे. ‘दारा’ हा चित्रपट गुन्हेगारी, शिक्षा आणि न्यायाची जुनी कहाणी दाखवेल.
