Kareena Kapoor Khan : आजोबांच्या पावलावर पाऊल टाकणार करीनाचा लेक? मोठा होऊन तैमूर..
Kareena Kapoor Khan News : करीना आणि सैफ यांना तैमूर आणि जहांगीर अशी दोन मुलं आहेत. त्यांच्याबद्दल त्यांनी अनेक स्वप्न पाहिली आहेत.त्याबद्दल खुद्द करीनाने एका मुलाखतीत खुलासा केला.

करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही बॉलिवूडच्या नामवंत अभिनेत्रींपैकी एक आहे. सौंदर्यासोबत खणखणीत अभिनयाने तिने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं असून आत्तापर्यंत अनेक सिनेमात तिने अव्वल भूमिका केल्या आहेत. तिचा अभिनय, अदा आणि प्रत्येक एक्स्प्रेशन लाखो चाहत्यांना पसंत असून तिचं बरंच कौतुकही होतं. विशेष म्हणजे बिजी असूनही करीना ही तिचा पती सैफ अली खान आणि दोन्ह मुलांसोबत नेहमी वेळ घालवते. सोशल मीडियावर ती आणि सैफ अनेकदा कपल व्हेकेशनचे फोटो शेअरही करतात. सैफ आणि करीना या दांपत्याला २ मुलं आहे, तैमूर आणि जहांगीर. ते बऱ्याचदा मीडियासमोरही दिसतात. करीना आणि सैफ जरी अभिनय क्षेत्रत असलं तरी त्यांचा मोठा मुलगा तैमूर हा काही आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन अभिनय क्षेत्रात येण्यास उत्सुक नाहीये.
हो हे खरं आहे आणि याचा खुलासा खुद्द करीनानेच केल. एका मुलाखतीत करीनाने सांगितलं की तैमूरला अभिनयात नव्हे तर दुसऱ्य क्षेत्रात रस आहे. करीनाच्या सांगण्यानुसार, तैमूर याला त्याच्या आई-वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात यायचं नाही तर त्याचे आजोबा मंसूर अली खान यांच्या पावलावर पाऊल टाकायचं असून त्याला स्पोर्ट्समध्ये ( क्रीडा क्षेत्र) करिअर घडवायचं आहे.
तैमूरला काय करायचं आहे ?
हनुमान दास यांच्यासोबत झालेल्या संवादादरम्यान करीनाने सांगितलं की तैमूरला क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये खूप रस आहे आणि भविष्यात त्याला यापैकी एखादा खेळ करिअर म्हणून निवडायचा आहे. “ टिम (तैमूर) म्हणतो की त्याला फुटबॉलपटू किंवा क्रिकेटपटू व्हायचं आहे, कारण सध्या त्याचे संपूर्ण लक्ष खेळांकडे आहे. तेव्हा मी त्याला सांगते की, जर तुला हेच करायचे असेल तर नक्की कर.त्याला जागतिक स्तरावर फुटबॉल किंवा क्रिकेट खेळायचं आहे ‘ पण हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तुला मेहनत करावी लागेल, असं मी त्याला सांगितलं. त्याला योग्य दिशेने पुढे जाण्यासाठी आपण प्रोत्साहन दिले पाहिजे, असं करीनाने नमूद केलं.
कदाचित भविष्यात तैमूरचा निर्णय बदलू शकतो आणि त्यात काहीही गैर नाही, असं ती म्हणाली. तो फिल्मी कुटुंबातला आहे, म्हणून त्याने अभिनेताच व्हायला हवं असं आवश्यक नाही. या कुटुंबातून त्याला वेगवेगळ्या क्षेत्रांचा अनुभव नक्कीच मिळू शकतो, पण अंतिम निर्णय त्याचाच असेल, असं करीनाने नमूद केलं.
करीनाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती लवकरच मेघना गुलजारच्या ‘दायरा’ चित्रपटात दिसणार आहे. त्यात तिची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात करीनासोबत पृथ्वीराज सुकुमारन हाही दिसणार आहे.
