Kareena Kapoor ‘या’ अभिनेत्यासाठी सलमान खान याच्यासोबत असं काय केलं, ज्यामुळे भाईजानला बसला मोठा धक्का
करीना कपूर हिच्यामुळे घडलेली घटना ऐकल्यानंतर सलमान खान याला बसला धक्का, यावर बेबो म्हणाली, 'कमीतकमी मी प्रामाणिक तरी आहे... ' नक्की झालं तरी काय?

मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सलमानच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील फार मोठी आहे. महत्त्वाचं म्हणजे समलान बॉलिवूडच्या प्रसिद्ध खान कुटुंबातील मुलगा असल्यामुळे अनेक सेलिब्रिटींच्या मुलांसोबत अभिनेत्याचं बालपण गेलं. अभिनेत्री करिश्मा कपूर, करीना कपूर यांच्यासोबत देखील सलमान खान याच्या खास आठवणी आहे. दरम्यान, अभिनेता सलमान खान याच्या ‘दस का दम’ शोमध्ये कपूर सिस्टर्सनी हजेरी लावली होती. यावेळी करिश्माने सलमान आणि करीना यांच्याबाबत मोठं सत्य उघड केलं. सलमान खान याचा ‘मैने प्यार किया’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर करीना कपूर हिला सलमान आवडायला लागला होता…
एवढंच नाही तर, करिनाने तिच्या बाथरुममध्ये सलमान खान याचा फोटो देखील लावला होता. पण एक वेळ अशी अली जेव्हा अभिनेत्रीने सलमान खान याचा फोटो फाडून टाकला. सलमान खान म्हणाला, ‘मी एक तुम्हाला किस्सा सांगतो. जव्हा ‘मैने प्यार किया’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि मी करिश्मा कपूर हिच्यासोबत आगामी सिनेमाचं शुटिंग करत होतो. करिश्मासोबत केलेला सिनेमा फ्लॉप झाला…’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘तेव्हा मला करिश्माने करीना हिच्याबद्दल एक गोष्ट सांगितली होती. करीनाने माझा फोटो बाथरुममध्ये लावला आहे.. मला प्रचंड आनंद झाला. ‘मैने प्यार किया’ सिनेमाच्या तीन महिन्यांनंतर ‘आशिकी ‘ सिनेमा प्रदर्शित झाला. तेव्हा करीनाने माझा फोटो फाडला आणि राहुल रॉय याचा फोटो बाथरुममध्ये लावला.’
यावर करीना म्हणाली, ‘कमीतकमी मी प्रामाणिक तरी आहे… ‘ सांगायचं झालं तर, सलमान आणि कपूर सिस्टर्सच्या मैत्री बद्दल अनेक गोष्टी रंगलेल्या असतात. सलमान खान आणि करीना कपूर यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन देखील शेअर केली. त्यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं.
सलमान खान आणि करीना कपूर यांनी ‘बॉडीगार्ड’, ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘मैं और मिसेज खन्ना’ यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. नुकताच सलमान खान याचा ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमात अभिनेत्री पूजा हेगडे, वेंकटेश, जगपती बाबू, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, शहनाज गिल, जस्सी गिल, पलक तिवारी मुख्य भूमिकेत झळकले. आता अभिनेता ‘टायगर ३’ सिनेमामुळे चर्चेत आहे.
