पाणावलेले डोळे, उदास चेहरा.. पूर्व पतीच्या अंत्यसंस्काराल पोहोचली करिश्मा, Video व्हायरल!
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर पूर्व पती संजय कपूरच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिली आहे. करिश्मा आपल्या संपूर्ण कुटुंबासह दिल्लीत पोहोचली. 12 जून रोजी संजयने जगाचा निरोप घेतला होता.

दिल्लीत आज, म्हणजेच 19 जून रोजी, उद्योगपती संजय कपूरवर अंत्यसंस्कार होणार आहेत. संजय हा बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती होता. करिश्मा आपल्या पतीच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीत पोहोचली आहे. आणि केवळ करिश्माच नाही, तर तिच्या कुटुंबातील इतर सदस्यही संजय कपूरच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले आहेत. दरम्यान, तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
करिना कपूर आणि सैफ अली खान यांनीही संजयच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली. संजय कपूरचे 12 जून रोजी निधन झाले होते. तो हॉर्स पोलो खेळत होता. घोड्यावर स्वार असताना त्याच्या तोंडात मधमाशी शिरली, ज्याने त्याच्या घशात दंश केला. त्यानंतर संजय कपूरला हृदयविकाराचा झटका आला आणि तो घोड्यावरून खाली पडला. त्याला वैद्यकीय उपचार देण्यात आले, पण त्याचा जीव वाचू शकला नाही.
VIDEO | Delhi: Actor Karisma Kapoor attends the funeral of her ex-husband Sunjay Kapur.#SunjayKapurFuneral
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/VOqjJYfL3u
— Press Trust of India (@PTI_News) June 19, 2025
संजयचे निधन युकेमध्ये झाले होते. त्याचे पार्थिव भारतात आणण्यास विलंब झाला, त्यामुळे आज दिल्लीत त्याच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला. पार्थिव आणण्यास विलंब होण्याचे कारण म्हणजे त्याच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व होते, त्याचे निधन इंग्लंडमध्ये झाले आणि पार्थिव भारतात आणायचे होते. त्यामुळे कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यात विलंब झाला आणि त्याचे पार्थिव आणण्यास वेळ लागला.
लग्नाच्या 13 वर्षांनंतर संजय-करिश्मा यांचा घटस्फोट
संजयने 2003 मध्ये करिश्मा कपूरशी लग्न केले होते. हे संजयचे दुसरे लग्न होते. त्यापूर्वी त्याचे नंदिता महतानी यांच्याशी 1996 मध्ये लग्न झाले होते. मात्र, चार वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर संजयच्या आयुष्यात करिश्मा आली. पण लग्नाच्या काही वर्षांनंतरच दोघांमधील नात्यात अडचणी येऊ लागल्या. दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले.
लग्नाच्या 13 वर्षांनंतर 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. करिश्मापासून घटस्फोटानंतर एका वर्षांनी, म्हणजेच 2017 मध्ये, संजयने प्रिया सचदेवशी लग्न केले. दोघेही त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप खूश होता. मात्र, आता संजयनी या जगाला निरोप दिला आहे.
