
Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आणि दिवंगत पूर्व पती संजय कपूर (Sunjay Kapur) यांच्या घटस्फोटाला अनेक वर्ष झाली आहेत. पण घटस्फोटानंतर देखील दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं. 2016 मध्ये करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट झाला आणि दोघ मुलांचा सांभाळ करिश्मा हिने ‘सिंगल मदर’ म्हणून करण्याचा निर्णय अभिनेत्रीने घेतला. आता संजय कपूर याच्या संपत्तीचा वाद सुरु असताना करिश्मा हिचे खासगी व्हाट्सएप चॅट समोर आले आहे.
सांगायचं झालं तर, संजय कपूर याच्या निधनानंतर कुटुंबात 30 हजार कोटी रुपये संपत्तीचा वाद सुरु आहे. तिसरी पत्नी प्रिया सचदेवने मालमत्तेवर दावा केल्यानंतर, करिश्मा कपूरची मुले समायरा आणि कियान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये त्यांनी वडील संजय कपूरच्या मालमत्तेत वाटा मिळावा अशी मागणी केली आहे. एवढंच नाही तर, प्रिया हिने बनावट मृत्युपत्र तयार केल्याचा आरोप देखील लावला आहे.
याचिकेत करिश्मा कपूर हिच्याकडून काही कागदपत्र सादर करण्यात आली आहे. ज्यामध्ये दोघांचे व्हाट्सएप चॅट देखील आहे. ज्यामध्ये करिश्मा आणि संजय यांच्यामध्ये चांगले संबंध होते असं दिसत आहे. रोपोर्टनुसार, कागदपत्रांवरून असं दिसून आलं की संजय कपूर करिश्मा कपूर आणि दोन्ही मुलांसाठी पोर्तुगीज नागरिकत्वाची व्यवस्था करत होता.
एका चॅटमध्ये संजय कपूरने दुसरी पत्नी करिश्मा कपूरला सांगितलं होतं की, पोर्तुगीज नागरिकत्व मिळविण्यासाठी त्यांना भारतीय नागरिकत्व सोडावं लागेल कारण भारतात दुहेरी नागरिकत्वाला परवानगी नाही. अशात आता याप्रकरणी काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…
करिश्मा कपूरच्या मुलांनी दाखल केलेल्या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, प्रियाने त्यांचे वडील संजय कपूर याची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी बनावट मृत्युपत्र तयार केलं. याचा विरोध करत प्रिया म्हणाली, करिश्माच्या मुलांना त्यांचा हिस्सा मिळाला आहे. ते गेल्या 15 वर्षांपासून कुठे होते? असा प्रश्न देखील प्रिया हिने उपस्थित केला आहे. सध्या न्यायालयाने प्रियाला सर्व मालमत्तेची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत आणि पुढील सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे.