म्हणून करिश्मा कपूरने आईसमोर शूट केला ‘राजा हिंदुस्तानी’मधील किसिंग सीन; दिग्दर्शकांचा खुलासा

धर्मेश यांनी असंही सांगितलं की निर्मात्यांना आमिर आणि करिश्माचा किसिंग सीन पोस्टरवर दाखवायचा होता. जेणेकरून चित्रपटाची अधिकाधिक चर्चा होईल. मात्र धर्मेश यांनी त्याची परवागनी दिली नाही. 1996 मध्ये प्रदर्शित झालेला 'राजा हिंदुस्तानी' हा सुपरहिट चित्रपट ठरला होता.

म्हणून करिश्मा कपूरने आईसमोर शूट केला 'राजा हिंदुस्तानी'मधील किसिंग सीन; दिग्दर्शकांचा खुलासा
Karisma KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 24, 2023 | 1:52 PM

मुंबई : 24 ऑक्टोबर 2023 | अभिनेत्री करिश्मा कपूरने तिच्या फिल्मी करिअरमध्ये बऱ्याच दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘राजा हिंदुस्तानी’ हा तिच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये करिश्मा आणि आमिर खान मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. आमिर आणि करिश्माच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन करताना धर्मेश दर्शन यांना समजलं की करिश्मा ही राज कपूर यांच्या कुटुंबातील आहे. एका मुलाखतीत दिग्दर्शकांनी सेटवरील करिश्माचा एक किस्सा सांगितला होता. करिश्माने एका सीनसाठी धर्मेश यांच्याकडे विनंती केली होती.

‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटातील एका सीनमध्ये पार्टीत आमिर नशेत धुंद होतो आणि करिश्माचा सर्वांसमोर अपमान करतो. यामध्ये तो करिश्माचे केस पकडून तिला ओढल्याचाही सीन होता. मात्र या सीनबद्दल आमिरच्या मनात संभ्रम होता. याबद्दल दिग्दर्शक म्हणाले, “आमिरने मला म्हटलं की नाही, नाही. आपण असं करू शकत नाही. त्यापेक्षा मी तिचा हात पकडून खेचतो. मला वाटलं की आमिर बरोबर बोलतोय. कदाचित मीच त्या सीनमध्ये विनाकारण हिंसा दाखवतोय. पण करिश्माला तो सीन रियल बनवायचा होता.”

हे सुद्धा वाचा

“करिश्मा मला सेटवर एका कोपऱ्यात घेऊन गेली आणि माझ्याकडे तिने एक विनंती केली. मी माझ्या आजोबांना खऱ्या आयुष्यात असं करताना पाहिलं आहे. तुम्ही त्यांचे चित्रपट विसरा. तिने असं म्हणताच मी आमिरकडे गेलो आणि करिश्माचे केस ओढण्याचा सीन तसाच करायला सांगितलं”, असं दिग्दर्शकांनी पुढे सांगितलं.

करिश्माच्या कामाचं आणि काम करण्याच्या पद्धतीचं कौतुक करताना त्यांनी पुढे आणखी एक किस्सा सांगितला. “ती सेटवर खूप चांगली वागायची. ती नेहमीच उत्साही असायची. ती तिच्या कामाबद्दल खूप प्रामाणिक होती आणि हे मी स्पष्टपणे पाहू शकत होतो. तिने त्याआधी कधीच किसिंग सीन शूट केला नव्हता. मी तिला कॉस्च्युम आणि बॅकग्राऊंडबद्दल सांगितलं. त्यानंतर तिची आई बबिताजी यांना मी संपूर्ण सीक्वेन्स समजावून सांगितला. कारण करिश्मा तेव्हा लहान होती आणि आई तिला नीट समजावून सांगू शकत होती. ती सेटवर गोंधळ घालणारी मुलगी नव्हती. बबिताजी संपूर्ण तीन दिवस सेटवर होत्या आणि मीसुद्धा त्यांना जाण्यास सांगितलं नाही”, असं धर्मेश म्हणाले.

Non Stop LIVE Update
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.