AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karisma Kapoor | ‘बेइज्जती करवा रहा है’, १३ वर्षांच्या लेकाला त्रासलीये करिश्मा कपूर? व्हिडीओ व्हायरल

'मला तिच्यासाठी प्रचंड वाईट वाटत आहे, तिचा मुलगा कायम...', करिश्मा कपूर हिच्या मुलाने सर्वांसमोर असं काय केलं ज्यामुळे आलाय चर्चांना उधाण... व्हिडीओ व्हायरल

Karisma Kapoor | 'बेइज्जती करवा रहा है', १३ वर्षांच्या लेकाला त्रासलीये करिश्मा कपूर? व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Jul 16, 2023 | 11:23 AM
Share

मुंबई | श्रीमंत उद्योजक संजय कपूर याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री करिश्मा कपूर हिने कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. संजय – करिश्मा यांना दोन मुलं आहे. त्यांच्या मुलीचं नाव समायरा असून मुलाचं नाव कियान असं आहे. करिश्मा कायम तिच्या मुलांसोबत दिसते. आता देखील अभिनेत्री तिच्या मुलासोबत दिसली. शनिवारी रात्री करिश्मा आणि तिचा मुलगा कियान याला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. पण कियान याची वागणूक पाहून लोक त्याला ट्रोल करत आहेत. सध्या सर्वत्र करिश्मा आणि कियान यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर नेटकरी दोघांच्या व्हिडीओवर कमेंट करत ट्रोल करत आहेत.

करिश्मा तिच्या मुलांसोबत गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होती. अभिनेत्री पुन्हा भारतात परतली आहे. करिश्माला मुलासोबत विमानतळावर पाहिल्यानंतर दोघांना कॅममेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझींनी गर्दी केली. पापाराझींना पाहिल्यानंतर करिश्मा पोझ द्यायला लागली. दरम्यान, फोटोमध्ये करिश्माने मुलाला देखील घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याने फोटोसाठी पोझ देण्यास नकार दिली.

मुलाच्या अशा वागणुकीनंतर करिश्मानेही कियानला मोकळं सोडलं आणि त्यानंतर अभिनेत्री पापाराझींना पोझ देताना दिसली. यासोबतच अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांसोबत फोटो देखील क्लिक केलं. सध्या सर्वत्र करिश्मा आणि कियान यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पण करिश्माने पापाराझींनी पोझ दिल्या, चाहत्यांसोबत फोटो देखील क्लिक केलं. पण कियान याच्या वागणुकीमुळे अभिनेत्री चर्चेत आली. व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, ‘अपमान करत आहे…’, तर अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘मला करिश्मासाठी वाईट वाटत आहे. तिचा मुलगा कायम संकोचल्यासारखा वाटत असतो..’ सध्या सर्वत्र कियान आणि करिश्मा यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

करिश्मा कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या लंडन ट्रिपमुळे चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर करिश्माच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...