Kartik Aaryan : कार्तिक आर्यन आणि मी.. डेटिंगच्या चर्चा सुरू होताच मिस्ट्री गर्लने सोडलं मौन
अभिनेता कार्तिक आर्यनचे गोवा व्हेकेशनचे फोटो समोर येताच प्रचंड खळबळ माजली. त्यातील एक फोटोतून त्याच्या डेटिंगबद्दल आणि मिस्ट्री गर्लबद्दल चर्चा सुरू झाली. करीना कुबिलियूते ही सध्या इंटरनेटवर फेमस झाली आहे.

बॉलिवूडमधील अफवांचा बाजार हा कधीकधी चित्रपटांपेक्षाही वेगाने चालतो आणि 2026 हे वर्षही त्याला अपवाद ठरलेलं नाही. या वर्षाच्या सुरूवातीलाच अभिनेता कार्तिक आर्यनचं (Kartik Aaryan) नाव गाजू लागलं आहे ते त्याच्या काही फोटोंमुळे. त्याच्या ‘तू मेरी मै तेरा, मै तेरा तू मेरी’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, पण असं असलं तरी कार्तिक अजूनही लाइमलाईटमध्ये आहे, तो त्याच्या पर्सनल लाईफमुळे. गोव्यातील त्याच्या फोटोमुळे डेटिंग लाइफबद्दल विविध अफवा सुरू झाल्या आहेत.
कार्तिक आर्यनने नुकताच त्याच्या गोव्यातील व्हेकेशनचे, समुद्रकिनाऱ्यावरील आरामदायी फोटो शेअर केले. फोटोमध्ये कार्तिक खूपच चिल दिसत होता, पण चाहत्यांची नजर गेली ती बँकग्राऊंडकडे. त्यानतंर काही युजर्सनी असा दावा केला की कार्तिकने टाकलेला फोटो आणि एका मुलीने टाकलेला फोटो बराच मिळता जुळता आहे. आणि त्यावरूनच कार्तिक व त्या मुलीचं काही सुरू आहे का अशा चर्चा बघचा बघता वेगाने सुरू झाल्या.
कोण आहे करीना कुबिलियूते ?
ज्या मुलीशी कार्तिकचं नावं जोडलं गेलं आणि जिच्या फोटोशी तुलना केली गेली तिचं नावं करीना कुबिलियूते असल्याचं सांगण्यात आलं. रिपोर्ट्सनुसार, करिना ही ग्रीसची आहे आणि सध्या ती यूकेमध्ये शिक्षण घेत आहे. सोशल मीडियावरील लोकांनी दोन्ही फोटोंमधील समुद्राचा अँगल, समुद्रकिनाऱ्यावरील बेडवर आणि अगदी टॉवेलची जागा यांचीही तुलना करत ते मॅचिंग असल्याचा निर्वाळा दिला.
रेडिटवरील युजर्सनी तर या चर्चेला आणखी हवा दिली. काहींनी असा दावाही केला की कार्तिक आर्यनने इन्स्टाग्रामवर करीनाला फॉलो केलं होतं, पण या डेटिंगच्या अपवा सुरू झ्लायवर त्याने तिला अनफॉलो केलं. पण या प्रकरणावर कार्तिक किंवा करीना कोाकडूनही अधिकृत स्टेटमेंट आलं नाही ज्यामुळे “मिस्ट्री गर्ल” बद्दलच्या चर्चेला आणखी चालना मिळाली.

अफवांवर अखेर बोलली करीना
पण आता या कहाणीत मोठा ट्विस्ट आला आहे. कारण कार्तिकचं नाव जिच्याशी जोडलं जात आहे त्या करीनानेच समोर येऊन मोठा खुलासा केला आहे. मी कार्तिकची गर्लफ्रेंड नाही, असं तिने स्पष्ट केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका स्क्रीनशॉटमध्ये करिनाने कमेंट केली. “मी त्याची GF (गर्लफ्रेंड) नाहीये!!!” असं म्हणत तिने सर्व अफवांचे स्पष्टपणे खंडन केलं.
कार्तिकचा शेवटचा चित्रपट, तू मेरी मै तेरा, मै तेरा तू मेरी (2025)रिलीज झाला. त्यात अनन्या पांडेची प्रमुख भूमिकेत होती. पण हा चित्रपट तो बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही.
