AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या जवळच्या व्यक्तींचं निधन; 3 दिवसांनंतर मिळाले मृतदेह

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत सोळा जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यात अभिनेता कार्तिक आर्यनच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. घटनेच्या तीन दिवसांनंतर कार्तिकच्या मामा-मामीचे मृतदेह सापडले. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या जवळच्या व्यक्तींचं निधन; 3 दिवसांनंतर मिळाले मृतदेह
Kartik Aaryan’s relativesImage Credit source: Instagram
| Updated on: May 17, 2024 | 2:58 PM
Share

सोमवारी 13 मे रोजी घाटकोपर इथं संध्याकाळी साडेचारच्या सुमारास महाकाय लोखंडी होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळून पेट्रोल पंपावर पडला. 140 बाय 140 चौरस फुटांचा हा फलक क्षणार्धात आदळल्यामुळे जवळ उभी असलेली वाहनं आणि शंभरहून अधिक नागरिक त्याखाली सापडले. आतापर्यंत या दुर्घटनेत सोळा जणांनी आपले प्राण गमावले. त्यात अभिनेता कार्तिक आर्यनच्या जवळच्या व्यक्तींचाही समावेश आहे. कार्तिकच्या मामा-मामींनी घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत आपला जीव गमावला आहे. घटनेच्या 50 तासांनंतर त्यांचा मृतदेह सापडला. तेव्हा त्यांना ओळखणंही कठीण होतं. अंगठीवरून त्यांची ओळख पटवण्यात आली.

60 वर्षीय मनोज चंसोरिया हे एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करत होते. तर त्यांची पत्नी अनिता या 59 वर्षीय होत्या. मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कार्तिक आर्यनसुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. मनोज चंसोरिया आणि त्यांची पत्नी हे कारने प्रवास करत होते. त्यावेळी होर्डिंगजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ त्यांनी पेट्रोल भरण्यासाठी कार थांबवली होती. हे दोघं मध्यप्रदेशला त्यांच्या घरी जात होते. पेट्रोल पंपाजवळ त्यांची कार थांबताच महाकाय होर्डिंग कोसळला. या होर्डिंगखाली त्यांची कार आली आणि त्यात त्यांनी प्राण गमावले.

व्हिसाशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यासाठी हे दाम्पत्य मुंबईत आलं होतं. अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी ते जाणार होते. मात्र होर्डिंग दुर्घटनेमुळे त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. घटनेच्या तीन दिवसांनंतर बचावकार्यादरम्यान त्यांचे मृतदेह सापडले. त्यानंतर त्यांचा मुलगा तातडीने भारतात परतला. अंगठीवरून दोघांच्या मृतदेहांची ओळख पटली. गुरुवारी सहार स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी इतर कुटुंबीयांसोबत कार्तिक आर्यनसुद्धा त्याठिकाणी उपस्थित होता.

पूर्व द्रुतगती मार्गावर छेडानगर परिसरात पेट्रोल पंपाजवळील होर्डिंग मुळाशी असलेले लोखंडी खांब मोडून जमिनीवर आदळला. या दुर्घटनेचे व्हिडीओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पाऊस पडत असल्यामुळे पेट्रोल पंपाच्या परिसरात अनेक वाहनचालक, पादचारी आडोशासाठी उभे होते. त्यांच्यावर हा महाकाय होर्डिंग कोसळल्यामुळे अनेज जण गाडले गेले. हे दृश्य अतिशय भीषण होतं.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!