AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda : माझा प्रोजेक्ट ना पतीने फायनान्स केला, ना बॉयफ्रेंडने…; कश्मीरा शाहचा गोविंदा – कोमलाला अप्रत्यक्ष टोला?

Kashmera Shah on govinda and komal rani : अभिनेत्री कश्मीरा शाह अलीकडेच मुंबई विमानतळावर दिसली. त्यावेळी तिने पेप्सला सांगितलं की ती तिच्या प्रोजेक्टसाठी देशाबाहेर जाणार आहे. याबरोबरच तिने काही असंही सांगितलं ज्यामुळे फॅन्स गोविंद आणि कोमल राणीशी जोडत आहेत.

Govinda : माझा प्रोजेक्ट ना पतीने फायनान्स केला, ना बॉयफ्रेंडने…; कश्मीरा शाहचा गोविंदा - कोमलाला अप्रत्यक्ष टोला?
| Updated on: Oct 07, 2026 | 2:32 PM
Share

कॉमेडियन आणि अभिनेता कृष्णा अभिषेकची पत्नी तसेच अभिनेत्री कश्मीरा शाह गेल्या काही काळापासून मोठ्या प्रोजेक्टपासून दूर होती. मात्र, आता अभिनेत्री लवकरच एका नव्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, या प्रोजेक्टमध्ये ती केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार असल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडेच कश्मीरा शाह मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. ती आपल्या आगामी प्रोजेक्टच्या निमित्ताने ग्रीसला रवाना होत होती. यावेळी पॅप्सने तिच्याशी संवाद साधला. कश्मीराने आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देताना काही असे वक्तव्य केले, ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. तिच्या या वक्तव्याचा संबंध अभिनेता गोविंदा आणि त्यांची कथित गर्लफ्रेंड कोमल राणी स्वर्णकार यांच्याशी जोडला जात आहे.

पॅप्सना कश्मिरा शाह काय बोलली ?

6 ऑक्टोबर रोजी कश्मीरा शाह मुंबई विमानतळावर दिसली. तिला पाहताच पॅप्सने ती कुठे जात आहे, असा प्रश्न विचारला. यावर कश्मीराने सांगितले की, ती एका नव्या प्रोजेक्टच्या कामासाठी युरोपला जात आहे. या प्रोजेक्टमध्ये ती अभिनेत्री आणि दिग्दर्शक अशा दोन्ही भूमिका साकारणार आहे, असं कश्मीराने सांगितलं. यावेळी तिने आपल्या प्रोजेक्टबाबत एक खास गोष्टही सांगितली. कश्मीरा म्हणाली, “खास गोष्ट म्हणजे हा एक स्वतंत्र प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट माझ्या पती कृष्णा अभिषेकने फायनान्स केलेला नाही आणि कोणत्याही बॉयफ्रेंडनेही नाही.”

कश्मीराच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार यांच्या कथित नात्याच्या चर्चा सुरू असल्याने, कश्मीराने हे वक्तव्य त्यांना उद्देशून केले का, असा सवाल नेटकरी करत आहेत. मात्र, कश्मीराने कोणाचेही नाव घेतलेले नाही.

गोविंदा आणि कोमलच्या कथित नात्याची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार यांच्या कथित प्रेमसंबंधांच्या चर्चा मनोरंजन विश्वात रंगल्या आहेत. दोघेही एका आगामी ‘रूपा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक गोविंदा स्वतः असल्याचे सांगितले जात आहे. या कथित नात्याच्या चर्चांना याच वर्षाच्या सुरुवातीला अधिक उधाण आले, जेव्हा गोविंदा आणि कोमल यांना मुंबई विमानतळावर तसेच लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी एकत्र पाहण्यात आले. त्यानंतर दोघांच्या सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या भेटीगाठींमुळे त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना आणखी बळ मिळाले.

या संपूर्ण प्रकरणावर गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनीही यापूर्वी प्रतिक्रिया दिली होती.

सुनीता आहुजांनी व्यक्त केला होता संताप

गोविंदा आणि त्याची को-स्टार कोमल राणी स्वर्णकार यांच्या कथित संबंधांच्या चर्चांदरम्यान सुनीता आहुजा यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली होती. त्यांनी महिला, जेन-झेड प्रेक्षक आणि माध्यमांना आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते.सुनीता आहुजा यांनी म्हटले होते, “मला हवंय की तुम्ही सर्वांनी मला पाठिंबा द्यावा. माझ्यासोबत जे काही सुरू आहे, ते योग्य नाही. माझं घर कोणत्याही कारणाशिवाय तुटत आहे. मला हवंय की सर्व महिलांनी माझ्यासाठी आवाज उठवावा आणि माझ्या सोबत उभं राहावं.” सुनीता यांच्या या वक्तव्यामुळे गोविंदा आणि कोमल राणी यांच्या कथित नात्याच्या चर्चेला आणखी हवा मिळाली.

कोमल राणीनेही केला होता पलटवार

सुनीता आहुजा यांच्या वक्तव्यानंतर कोमल राणी स्वर्णकार हिनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं गेलं. कोमल राणी हिने तिच्या स्टोरीमध्ये लिहिलं होतं की, “ज्या स्त्रीने वर्षानुवर्षे आपल्या पतीला मारण्याचा प्रयत्न केला आहे, अशा स्त्रीचा शाप कोणालाही लागत नाही. जे घर आधीच तुटलेलं आहे, ते दुसरं कोणीही तोडू शकत नाही.” यासोबतच तिने लोकांना कोणत्याही व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याआधी स्वतः विचार करण्याचा सल्लाही दिला होता.

दरम्यान, आता कश्मीरा शाहच्या नव्या प्रोजेक्टची आणि विमानतळावरील तिच्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. तिच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे होता, हे मात्र तिने स्पष्ट केलेले नाही.

Follow Us
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी