ही अभिनेत्री कधीच शाळेत गेली नाही, पण आज बॉलिवूडची टॉप अन् सर्वात श्रीमंत अभिनेत्री; 18 देशांमध्ये जगलीये आयुष्य
बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री जिने कधीही शाळेच तोंड पाहिली नाही तरही ती आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये टॉपची अभिनेत्री आहे. एवढंच नाही तर ती बॉलिवूडची सर्वात श्रीमंती अभिनेत्रीही आहे. चित्रपटांप्रमाणेच तिने आपल्या सौंदर्याने देखील चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री केवळ त्यांच्या अभिनय आणि चित्रपटांमुळेच नव्हे तर त्यांच्या संपत्तीमुळेही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी शिक्षणी पूर्ण केलं नसूनही त्या आज बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्री आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगत आहोत. ज्या अभिनेत्रीने कधी शाळेचं तोंडही पाहिलं नाही. पण तरीही ती आज बॉलिवूडची सर्वात टॉपची आणि श्रीमंत अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री आहे कतरिना कैफ. होय, कतरिना कधीही शाळेत गेली नाही. एवढंच नाही तर कतरिनाचे बालपण 18 वेगवेगळ्या देशांमध्ये गेलं. आहे. त्यामुळे तिला कोणत्याही एका शाळेत शिक्षण घेता आलं नाही.
अशी अभिनेत्री जिने कधीही शाळेच तोंड पाहिली नाही तरही ती बॉलिवूडची टॉप अभिनेत्री
कतरिना कैफचा जन्म 16 जुलै 1983 रोजी ब्रिटिश हाँगकाँगमध्ये झाला. ती खूप लहान असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. त्यामुळे तिचं आणि तिच्या बहिणींचं संगोपन तिच्या एकट्या आईने केलं. कतरिनाची आई एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. यामुळे त्यांना अनेक देशांमध्ये जावं लागत होतं. कतरिना जिथे जायची तिथे आईसोबत असायची. अशा परिस्थितीत, वेगवेगळ्या देशांमध्ये राहिल्यामुळे तिला शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही.
18 देशांमध्ये घालवले बालपण
मात्र जरी कतरिनाने कधीही शाळेत प्रवेश घेतला नसला, तरीही ती शिक्षित आहे. कारण तिच्यासाठी आणि तिच्या बहिणींसाठी आईने घरीच ट्यूशन लावली होती. त्यांना शाळेत जाऊन शिकता आलं नाही तरी किमान त्यांना घरी जेवढं काही ज्ञान देता येईल तेवढं देण्याचा तिच्या आईने नक्कीच प्रयत्न केले. अनेक देशांमध्ये राहिलेली कतरिना आता पूर्णपणे भारतीय झाली आहे. ती बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी भारतात आली होती. ही अभिनेत्री मेरे ब्रदर की दुल्हन, अजब प्रेम की गज़ब कहानी, टायगर 3, बँग बँग, एक था टायगर, जब तक है जान आणि धूम 3 सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.
View this post on Instagram
बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री
कतरिनाला सुरुवातीला हिंदी बोलण्यासाठी बऱ्याच अडचणी येत होत्या मात्र तिने त्यावरही काम केलं. आज ती बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आहे. इथपर्यंतचा तिचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. पण तिने तिच्या मेहनतीवर यश नक्कीच मिळवलं आहे. बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक ती मानली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिनाची एकूण संपत्ती सुमारे २२५ कोटी रुपये आहे. दरम्यान 2021 मध्ये प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलशी कतरिनाने लग्न केल.ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी आहे.
