AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोड, गोंडस…! कतरिना कैफ- विकीने शेअर केला विहानचा फोटो, लाडका लेक कुणासारखा दिसतो?

चिमुकल्या विहानची पहिली झलक पाहून चाहत्यांसह सिने कलाकारही त्याच्या प्रेमात पडलेत. अनेकांनी त्याच्या या गोड फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.

गोड, गोंडस...! कतरिना कैफ- विकीने शेअर केला विहानचा फोटो, लाडका लेक कुणासारखा दिसतो?
Katrina Kaif- Vicky KaushalImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 08, 2026 | 4:32 PM
Share

Actress Katrina Kaif Vickey Kaushal Shared Son Vihans Photo:  हिंदी सिनेसृष्टीतील क्यूट कपल अशी ओळख असलेले कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आपल्या चाहत्यांना मोठं सरप्राईज दिले आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी पहिल्यांदाच त्यांचा मुलगा विहानचा फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे. विकी आणि कतरिनाने एकत्रितपणे आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विहानसोबतचा सुंदर फोटो पोस्ट केला आहे. चिमुकल्या विहानची पहिली झलक पाहून चाहत्यांसह सिने कलाकारही त्याच्या प्रेमात पडलेत. अनेकांनी त्याच्या या गोड फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.

विकी- कतरिनाच्या लेकाची पहिली झलक! 

विकी कौशल आणि कतरिना कैफने शेअर केलेल्या फोटोमध्ये कतरिना कैफ पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे, तर विकी कौशल पांढऱ्या रंगाच्या डिझायनर कुर्ता-पायजमामध्ये दिसत आहे. फोटोमध्ये, विहानने त्याचे वडील विकीप्रमाणे पांढरा कुर्ता-पायजमा आणि आई कतरिनाप्रमाणे पिवळे नेहरू जॅकेट घातले आहे. विहानच्या गोंडसपणाने सर्वांची मने जिंकली आहेत. या फोटोसोबतच त्यांनी आमची आतापर्यंतची सर्वात तेजस्वी दिवाळी! तुम्हा सर्वांना प्रेम, प्रकाश आणि आनंदाने भरलेल्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. विकी, कतरिना आणि विहान असा सुंदर कॅप्शन लिहित सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.

कतरिना आणि विकीने विहानची पहिली झलक दाखवण्यासाठी चांगलाच शुभ मुहूर्त शोधला आहे. देशभरात दिवाळीमुळे मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे. दुसरी खास गोष्ट म्हणजे आज विहान एक वर्ष आणि एक दिवसाचा झाला आहे. विहानचा जन्म गेल्या वर्षी 7 नोव्हेंबरला झाला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचा चेहरा त्याच्या वाढदिवसानंतर दुसऱ्या दिवशी समोर आणण्याचा निर्णय घेतला.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

चाहत्यांसह सेलिब्रेटींकडून कमेंट्सचा वर्षाव!

विहानचा पहिला फोटो इंटरनेटवर पोस्ट होताच त्यावर चाहते आणि सेलिब्रिटींनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता अर्जुन कपूरने लिहिले, “लाडू…” अशी खास कमेंट केली आहे तर मलायकाने विहानला ‘आराध्य’ म्हटले आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने विहानला आशीर्वाद दिलेत. तसेच अभिनेत्री मृणाल ठाकूरने “बाळ विहान खूप गोंडस आहे. . दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, बाळा, अशा खास शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. थोडक्यात विहानच्या या फोटोने चाहत्यांसह सेलिब्रेटींनाही भुरळ घातली आहे.

Follow Us
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत,
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर