AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, ओमराजे निंबाळकरांनी शिवसेना एकत्रिकरणाची वात पेटवली, राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड!

ओमराजे निंबाळकर हे टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या एकत्र येण्यावर खूप महत्त्वाचं भाष्य केलं. सोबतच त्यांनी प्रत्येकाचीच तशी इच्छा आहे, असंही आवर्जून सांगितलं.

दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, ओमराजे निंबाळकरांनी शिवसेना एकत्रिकरणाची वात पेटवली, राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड!
omraje nimbalkar on shivsena mergerImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 08, 2026 | 4:29 PM
Share

Omraje Nimbalkar On Shivsena Merger : सध्या राज्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. खासदार शरद पवार यांना दोन्ही राष्ट्रवादीचे अनेक नेते भेटायला येत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर बया भेटीगाठी वाढल्या आहेत. तटकरे यांनी विलीनीकरणावर विधान केल्यानंतर या चर्चेला पेव फुटले. दरम्यान, एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना आता दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाचे नेते तथा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या एका विधानानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणावर बोललं जातंय.

शिवसेना एकत्र झाली तर आम्हाला आनंदच होईल

ओमराजे निंबाळकर हे टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या एकत्र येण्यावर खूप महत्त्वाचं भाष्य केलं. सोबतच त्यांनी प्रत्येकाचीच तशी इच्छा आहे, असंही आवर्जून सांगितलं. “सध्या दोन्ही पक्षांचे प्रमुख वेगवेगळे आहेत. त्यामुळे दोन्ही शिवसेनेच्या एकत्रिकरणाचा निर्णय शेवटी दोन्ही नेतृत्व करणारे नेतेच घेतील. शिवसेना एकत्र झाली तर आम्हाला आनंदच होईल. शिवसेना एकत्र आली तर चांगलेच आहे, असे सामान्य माणसांनाही वाटेल. सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावनाही तशाच आहेत,” असं मोठं विधान ओमराजेंनी केलं.

आमचा काम एवढं वाईट होतं का?

ओमराजेंनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला. त्यावर बोलताना “पक्षबदलाचा निर्णय घेताना काहीतरी घडलेले असतेच. टीका होणारा निर्णय कोणी खुशीने घेत नसतो. खाली परिस्थिती जेव्हा तशी तयार होते आणि जनतेने आम्हाला आरसा दाखवायला सुरुवात केली, तेव्हा असा निर्णय घ्यावा लागतो,” अस बोलून दाखवलं. सोबतच नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या बाबतीत असेल आमचा पराभव झाला होता. एकही पंचायत समिती किंवा नगरपालिका न येण्याएवढं आमचं वाईट काम होतं का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

चंद्रकांत रघुवंशींनी वात पेटवली

दरम्यान, ओमराजे यांनी शिवसेनेच्या एकत्रिकरणावर भाष्य केल्यानंतर आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिंदे गटाचे विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनीही सर्वात अगोदर शिवसेना एकत्रिकरणावर भाष्य केलं. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर खरी दिवळी ठरेल, असे विधान त्यांनी केले. त्यामुळे आता नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत,
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर