कतरिनाच्या प्रश्नावर विचारात पडला विकी; अखेर कियारा म्हणाली “तुला घरी..”

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

|

Updated on: Nov 27, 2022 | 1:23 PM

रॅपिड फायर प्रश्नाचं उत्तर देताना विकी कौशलची उडाली धांदल; उत्तर ऐकून नाराज होणार कतरिना

कतरिनाच्या प्रश्नावर विचारात पडला विकी; अखेर कियारा म्हणाली तुला घरी..
कतरिनाच्या प्रश्नावर विचारात पडला विकी
Image Credit source: Twitter

मुंबई: विकी कौशलच्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये तो हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकीसोबत या चित्रपटात कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या दोन्ही अभिनेत्रींसोबत तो सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र प्रमोशनच्या या मुलाखतींमध्ये कतरिनाबद्दल दिलेल्या उत्तरांमुळे तो विशेष चर्चेत आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकी कौशल, कियारा आणि भूमीला ‘रॅपिड फायर राऊंड’चे प्रश्न विचारले गेले. यातील एका प्रश्नामध्ये विकीची पत्नी कतरिना कैफचा उल्लेख होता. मात्र त्या प्रश्नाचं उत्तर देताना विकी विचारात पडला.

अनन्या पांडे, रकुलप्रीत सिंह आणि कतरिना कैफ यांपैकी कोणत्या अभिनेत्रीसोबत काम करण्यासाठी तू उत्सुक आहेस, असा प्रश्न यावेळी विकीला विचारण्यात आला होता. त्याचं उत्तर देताना मात्र विकी क्षणभरासाठी विचारात पडला. विकी काहीच बोलत नसल्याचं पाहून बाजूला बसलेली कियारासुद्धा आश्चर्यचकीत झाली.

हे सुद्धा वाचा

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

कियाराने विकीला विचारलं, “कतरिनाच्या नावाबद्दलही विचार करतोय? तुला आज घरी जायचं नाही का?” हे ऐकताच विकी कतरिनाचं नाव घेतो आणि म्हणतो, “हो हो, नक्कीच कतरिना कैफ.” विकी आणि कियारा ऑनस्क्रीन खूप चांगले वाटतील, अशा शब्दांत कियारा कौतुक करते.

यावेळी भूमी पेडणेकरला विकी कौशलबद्दल प्रश्न विचारला गेला. राजी, संजू आणि मसान या तीन चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटात विकीने दमदार काम केलं, असा प्रश्न विचारला असता ती क्षणाचाही विलंब न करता ‘मसान’ म्हणाली.

याआधीही नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकी म्हणाला होता, “कतरिना ठीक-ठाक डान्स करते आणि प्रतिभावान आहे. मात्र ती आणखी छान काम करू शकते.” या वक्तव्यानंतर तो लगेचच म्हणाला, “आज मला घरी जेवण मिळणार नाही.” हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI