AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर्ण झाली सिद्धार्थ – किआरा यांची ‘प्रेम कहाणी’, नव्या जोडप्याच्या लग्नाचा व्हिडीओ पाहिलात का?

लग्नाच्या फोटोंनंतर सिद्धार्थ - किआरा यांच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल... तुम्हालाही येईल तुमच्या आयुष्यातील जुन्या क्षणांची आठवण... दोघांच्या लग्नाचा व्हिडीओ एकदा नक्का पाहा...

पूर्ण झाली सिद्धार्थ - किआरा यांची 'प्रेम कहाणी', नव्या जोडप्याच्या लग्नाचा व्हिडीओ पाहिलात का?
पूर्ण झाली सिद्धार्थ - किआरा यांची 'प्रेम कहाणी', नव्या जोडप्याच्या लग्नाचा व्हिडीओ पाहिलात का?
| Updated on: Feb 10, 2023 | 2:16 PM
Share

kiara advani sidharth malhotra wedding : लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न झाल्यानंतर होणारा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. ७ फेब्रुवारी रोजी अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) यांनी लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ – किआरा विवाहबंधनात अडकले आणि दोघांनी स्वतःची प्रेम कहाणी पूर्ण केली. रिलेशनशिपमध्ये असताना सिद्धार्थ – किआरा यांनी कधीही त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नाही. शिवाय लग्नाच्या तारखेबद्दल देखील कोणतीही घोषणा केली नाही. लग्न झाल्यानंतर अखेर दोघांनी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट नात्याची कबुली दिली.

सिद्धार्थ आणि किआरा यांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल झाले.आता दोघांच्या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नाच्या दिवशी सिद्धार्थ – किआरा एकमेकांसोबत प्रचंड आनंदी असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये शाही अंदाजात किआरा लग्नमंडपात येते. शिवाय अभिनेत्री गाण्यावर ठेका धरताना देखील दिसत आहे. त्यानंतर किआरा आणि सिद्धार्थ एकमेकांना वरमाला घालतात. सध्या सर्वत्र किआरा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाच्या व्हिडीओची चर्चा आहे.

किआरा आणि सिद्धार्थ यांनी लग्नात ‘नो फोटो पॉलिसी’ निर्णय कायम ठेवला होता. त्यामुळे लग्नादरम्यान दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले नाहीत. अखेर लग्न झाल्यानंतर किआरा आणि सिद्धार्थ यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले आणि चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. आता किआरा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर देखील चाहते शुभेच्छा देत आहेत. (kiara advani and sidharth malhotra wedding time)

किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा यांनी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सप्तपदी घेतल्या. अनेक चाहत्यांसह सेलिब्रिटींनी देखील दोघांचे फोटो पोस्ट करत किआरा – सिद्धार्थ यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. लग्नात किआरा हिने बेबी पिंक रंगाचा लेहंगा घातला होता. तर सिद्धार्थ याने रुबाबदार शेरवानी घातली होती. लग्नाच्या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री प्रचंड सुंदर दिसत आहे. इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत किआरा हिने कॅप्शनमध्ये, ‘आता आमची कायमची बुकिंग झाली आहे…’ असं लिहिलं आहे.

किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचं नातं कधीही समोर आलं नाही. पण जेव्हा ‘शेरशाह’ सिनेमातून दोघे प्रेक्षकांच्या भोटीस आले, तेव्हा चाहत्यांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. ‘शेरशाह’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चहत्यांना प्रचंड आवडली. (kiara advani and sidharth malhotra relationship)

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच