AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indoo Ki Jawani | कियारा अडवाणीचा ‘इंदू की जवानी’ चित्रपट प्रदर्शित, कोरोना काळातही बॉक्स ऑफिसवर धमाल होणार?

कियारा अडवाणीचा 'इंदू की जवानी' हा चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कियाराशिवाय आदित्य सील मुख्य भूमिकेत आहे.

Indoo Ki Jawani | कियारा अडवाणीचा 'इंदू की जवानी' चित्रपट प्रदर्शित, कोरोना काळातही बॉक्स ऑफिसवर धमाल होणार?
| Updated on: Dec 11, 2020 | 10:51 AM
Share

मुंबई : कियारा अडवाणीचा ‘इंदू की जवानी’ हा चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कियाराशिवाय आदित्य सील मुख्य भूमिकेत आहे. अल्पावधीतच कियारा अडवाणीने तिच्या अभिनयाने चांगली फॅन फॉलोइंग केली आहे. आता हे महत्वाचे आहे की, ‘इंदू की जवानी’ हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचण्यात यशस्वी ठरणार का? (Kiara Advani’s ‘Indu Ki Jawani’ screened) कोरोना काळानंतर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘सूरज पे मंगल भारी’ हा चित्रपट पहिला होता तर, या चित्रपटानंतर बॉलिवूडमधील ‘इंदू की जवानी’ हा दुसरा मोठा चित्रपट आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर काय कमाल होते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर काही चांगली कामगिरी दाखविण्यात यश मिळू शकत नाही. माउ, मुंबई आणि दिल्ली मधील बुकमाय शोच्या माध्यमातून केलेले अ‍ॅडव्हान्स बुकिंग असे सुचवते की कियाराचा हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज होताना कोरोनामध्ये चांगली कमाई करणारा पहिला चित्रपट ठरू शकतो.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शकाचे लक्ष बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नसून प्रेक्षकांवर आहे. अधिकाधिक लोक चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये यावे अशी निर्मात्यांची इच्छा आहे, जेणेकरून पुन्हा एकदा वातावरण तयार होऊ शकेल जे कोरोना काळाच्या आधीचे होते. चित्रपटाचे दिग्दर्शक अबीर सेनगुप्ता म्हणतात की, आपला आत्मविश्वास परत मिळवणे आणि बाहेर जाऊन सिनेमागृहात चित्रपट पाहणे खूप अवघड आहे, कारण हा एक साथीचा रोग आहे. पण आपल्याला करमणुकीचीही गरज आहे. अशा परिस्थितीत आम्ही दुसरा कशाचा विचार केला नाही. कियारा अडवाणी तिच्या संपूर्ण कुटुंबासमवेत चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात पोहोचली होती. चित्रपटगृहातील चित्रपट पाहतानाची तिने काही छायाचित्रेही शेअर केली आहेत. असे करून, कियाराने लोकांमध्ये हा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

नीतू कपूर यांचे पुनरागमन

वरुण धवन आणि कियारा अडवाणी हे दोघेही या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी ही जोडी धर्मा प्रॉडक्शनच्या ‘कलंक’ या चित्रपटातील एका गाण्यामध्ये दिसली होती. ‘जुग जुग जिओ’ चित्रपटात कियारा अडवाणी आणि वरुण धवन व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दिग्दर्शक राज मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री नीतू सिंह यांनी नुकतेच चित्रीकरणादरम्यान सेटवरील त्यांचा एक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होता. या फोटोत नीतू शॉटसाठी तयार होताना दिसल्या होत्या. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर पहिल्यांदाच चित्रीकरण करत आहेत. नीतूला पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहून चाहते खूप आनंदित झाले आहेत. सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट करत नीतू यांनी लिहिले की, ‘बऱ्याच वर्षानंतर मी सेटवर परत येत आहे. एक नवीन सुरुवात आणि चित्रपटांची जादू आहे. मला थोडी भीती वाटते पण, मला माहित आहे की तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस.

संबंधित बातम्या :

Akshay Kumar | ‘लक्ष्मी’च्या प्रमोशनसाठी अक्षय आणि कियाराची ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये हजेरी!

बहुचर्चित ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज, नेमका इतिहास काय?

(Kiara Advani’s ‘Indu Ki Jawani’ screened)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.