Akshay Kumar | ‘लक्ष्मी’च्या प्रमोशनसाठी अक्षय आणि कियाराची ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये हजेरी!

‘द कपिल शर्मा शो’मध्ये या आठवड्यात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी दिसणार आहेत. आगामी ‘लक्ष्मी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे दोघेही कपिल शर्मा शोमध्ये आले आहेत.

Akshay Kumar | 'लक्ष्मी'च्या प्रमोशनसाठी अक्षय आणि कियाराची ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये हजेरी!

मुंबई : ‘द कपिल शर्मा शो’मध्ये या आठवड्यात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी दिसणार आहेत. आगामी ‘लक्ष्मी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे दोघेही कपिल शर्मा शोमध्ये आले आहेत. यावेळी अक्षय कुमारने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येण्याची गोल्डन जुबली पूर्ण केली आहे. अक्षय कुमारची ‘कपिल शर्मा शो’मध्ये येण्याची ही पंचविसावी वेळ आहे. अक्षय कुमार ज्या ज्यावेळी कपिल शर्मा शोमध्ये आला, त्या त्यावेळी त्याने खुप धमाल केली आहे. यावेळीही कपिलला अक्षय कुमार साडी नेसण्याचे चॅलेंज देताना दिसणार आहे. तर, अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी लक्ष्मी चित्रपटाच्या शुटींग वेळी घडलेले अनेक रंजक किस्से सांगणार आहेत. (Akshay Kumar and Kiara Advani The Kapil Sharma show promotion of Lakshmi movie)

अक्षय कुमार सोबत यावेळी कियारा अडवाणी आली आहे. ती म्हणते की, ‘मी बर्‍याच दिवसांनंतर कपिल शर्मा शोमध्ये आले आहे आणि मला खूप छान वाटते आहे.’ कपिल शर्मा कियारा अडवाणी विचारतो की, लॉकडाऊनमध्ये तू काय केले, यावर कियारा अडवाणी सांगते लॉकडाऊन लागण्याच्या अगोदरच आमच्या चित्रपटाचे शुटींग सुरू होते. त्यावेळी अक्षय कुमार सरांचे मेकअप मामा खूप छान लाडू तयार करून आणायचे आणि ते मला खूप आवडायचे त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मी ते लाडू बनवायला शिकले. मात्र, त्यामध्ये थोडा बदल करून कुकीज तयार केले आणि त्याची चव अतिशय चांगली आहे. तुमच्या सर्वांचे तोंड गोड करण्याठी मी स्व:ता तयार करून आणले आहेत.’ यावर कपिल शर्मा म्हणतो की, तू हे सर्व इंग्रजीत बोलत आहेस, मला काहीच समजत नाही, पण मी तुझा आभारी आहे.

बॉलिवूड अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा हे दोघेही ‘द कपिल शर्मा शो’मध्ये काही दिवसांपूर्वी आले होते. कपिल शर्मा आणि रितेशची चांगलीच जुगलबंदी पाह्याला मिळाली होती. या शोमध्ये आलेल्या जेनेलिया आणि रितेशची फिरकी घेण्यासाठी कपिलने त्यांना एक मजेशीर सवाल केला होता. रितेश अभिनेता आहेच. पण तो एका मोठ्या राजकीय कुटुंबातून आलेला आहे. त्यामुळे लग्नाच्यावेळी तू त्याच्यासोबत सात फेरे घेतलेस की त्याच्याकडून राजकीय लोक घेतात तशी शपथ वदवून घेतलीस, असा सवाल कपिलने जेनेलियाला केला. त्याला जेनेलियाने उत्तर देण्याऐवजी रितेशनेच उत्तर देऊन कपिलची बोलती बंद केली होती. लग्नात आम्ही फेरे घेतले. शपथ घेतली जाते, तेव्हा पाच वर्षांनी सरकार बदलत असते. त्यामुळे आम्ही शपथ न घेता फेरे घेतले आहे, अशी मिश्किल टिप्पणी रितेशने करताच एकच खसखस पिकली.

संबंधित बातम्या : 

Laxmii | खिलाडी कुमारला ‘बॉयकॉट’चा धसका, अखेर ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव बदलले!

(Akshay Kumar and Kiara Advani The Kapil Sharma show promotion of Lakshmi movie)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI