जेव्हा आमिर खानने रागात बोलणं बंद केलं; पूर्व पत्नी किरण राव ढसाढसा रडू लागली, अभिनेत्याने स्वत:च सांगितला किस्सा
आमिर खानने एका मुलाखतीत त्याच्या हट्टी स्वभावाचा किस्सा सांगितला. त्याच्या या सवयीमुळे त्याची पूर्वपत्नी किरण राव अक्षरश: त्याच्यासमोर रडली होती. त्याच्या हट्टीपणाचे परिणाम त्याच्या नातेसंबंधावर कसे पडले हे यातून स्पष्ट होते.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा आगामी चित्रपट ‘सितारे जमीन पर’ लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत आमिर खानने त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक खुलासा केला. आमिरने सांगितले की त्याच्या एका सवयीमुळे त्याची माजी पत्नी किरण राव एकदा ढसाढसा रडली होती.
आमिर खान त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. अभिनेत्याचा ‘सीतारे जमीन पर’ हा चित्रपट काही आठवड्यात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे . बऱ्याच काळानंतर आणि वर्षांनी आमिर खान मोठ्या पडद्यावर परतणार आहे. प्रेक्षक 20 जून 2025 रोजी हा चित्रपट पाहू शकतात. दरम्यान, अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान त्याने दावा केला की तो स्वभावाने फारच हट्टी आहे. या एका सवयीमुळे अभिनेत्याची माजी पत्नी किरण राव वारंवार नाराज असायची. रडायची.
आमिर बोलत नव्हता किरण त्याच्या समोर ढसाढसा रडायला लागली
एका पॉडकास्टमध्ये आमिर खानने सांगितले की जर कोणी त्याला दुखावले तर काहीही झालं तरी तो त्या व्यक्तिशी कधीही बोलत नाही. एकदा आमिरने त्याच्या पूर्व पत्नी किरण रावबाबत एक गोष्ट सांगितली. त्याचे आणि किरणचे कशावरून तरी भांडण झाले होते. त्यानंतर तो तिच्याशी बोलत नव्हता. तो म्हणाला की ते एकाच घरात राहत होते. पण तरीही ते एकमेकांशी बऱ्याच दिवसांपासून बोलत नव्हते. अखेर किरण त्याच्याशी स्वत:हून बोलायला आली. तरी देखील तो किरणशी बोलला नाही. त्यानंतर तिला एवढं वाईट वाटलं की ती त्याच्या समोर ढसाढसा रडायला लागली.
अभिनेता 7 वर्षांपर्यंत जुहीशी बोलला नाही
त्याच मुलाखतीत आमिरने उघड केले की त्याचे जुही चावलासोबत एका छोट्याशा कारणावरून भांडण झाले होते. अभिनेता 7 वर्षांपर्यंत जुहीशी बोलला नाही. आमिरची पहिली पत्नी त्याला पुन्हा जुहीशी बोलायला सुरुवात करण्याचा सल्ला देत असे पण त्याने तो सल्ला ऐकला नाही.
