आमिर खान याच्यासोबतच्या घटस्फोटावर किरण रावचा मोठा खुलासा, माझ्या पालकांनी..
बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा कायमच चर्चेत असतो. आमिर खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आमिर खान आणि किरण राव यांनी एकमेकांसोबत घटस्फोट घेत सर्वांनाच मोठा धक्का दिला. मात्र, विशेष म्हणजे घटस्फोटानंतरही दोघे एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात.

आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट घेतल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट घेतल्याचा खुलासा केला. यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. मात्र, आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट नेमका का घेतला हे कोणालाही कळू शकले नव्हते. आमिर खान आणि किरण राव यांची जोडी बॉलिवूडच्या टॉप जोडींपैकी नक्कीच एक होती. विशेष म्हणजे घटस्फोटानंतरही आम्ही चांगले मित्र असल्याचे सांगताना कायमच आमिर खान आणि किरण राव हे दिसतात. हेच नाहीतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी लापता लेडीज चित्रपटातही एकत्र काम केले. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही दोघे दिसले होते.
काही दिवसांपूर्वीच किरण राव हिने अत्यंत मोठा खुलासा केला होता. किरण राव हिने म्हटले होते की, घटस्फोटानंतरही मी आणि आमिर एकाच इमारतीमध्ये राहतो, एकत्र जेवण करतो आणि प्रत्येक गोष्ट एकमेकांना शेअर करतो. किरण राव हिचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे देखील बघायला मिळाले.
आता नुकताच एक मुलाखत किरण राव हिने दिलीये. या मुलाखतीमध्ये किरण राव हिने आमिर खान याच्यासोबतच्या नात्याबद्दल काही मोठे खुलासे केले आहेत. किरण राव ही म्हणाली की, माझे पालक मला नेहमीच म्हणतात की, तू आणि आमिर इतके जास्त चांगले मित्र आहेत तर तुम्ही घटस्फोट का घेतला? यावर किरण पुढे म्हणाली की, मुळात म्हणजे मला स्पेसची खूप जास्त गरज होती.
माझ्या स्वत:साठी वेळ असेल आणि आजादचे वडील माझे मित्र आणि माझे कुटुंब माझ्यासोबत आहे. या गोष्टींवर येण्यासाठी मला खूप जास्त वेळ लागला. फक्त मलाच नाहीतर आमिरलाही तो वेळ लागला. मुळात म्हणजे आम्ही दोघेही कुठेही गेलो नाहीत. आम्ही खूप वर्षांपासून एकमेकांच्यासोबत आहोत.
फक्त ऐवढे आहे की, यासाठी आम्हाला एकमेकांसोबत लग्न करण्याची गरज नाही. करण पुढे म्हणाली, लग्नाच्या अगोदर अनेक वर्ष मी सिंगलच होते. मला माझ्या आयुष्यात आजादी आवडते. मुळात म्हणजे घटस्फोटानंतर मला कधीच एकटेपणाही जाणवा नाही. कारण त्यावेळी माझ्यासोबत माझा मुलगा आजाद हा होता.
