‘रागात त्याचा चेहरा बदलायचा, प्राण्यांसारखा व्हायचा, भीती वाटायची’; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे धक्कादायक वक्तव्य
एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने त्यांच्याबद्दल असे काही खुलासे केले आहेत की कोणालाही जाणून धक्का बसेल. या अभिनेत्याच्या रागाबद्दल हा त्यांच्या पत्नीने अशी काही बाजू सांगितली की कोणालही ते जाणून धक्का बसेल. अशाच पद्धतीने अनेक सेलिब्रिटींच्या ग्लॅमरस जीवनातील 'डार्क सिक्रेट्स' या मुलाखतीतून समोर आले आहेत, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आश्चर्य वाटेल.

बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींची ग्लॅमरचे जग आणि खऱ्या आयुष्यातले जग हे फार वेगळे असते. त्यांच्या खऱ्या आयुष्याची बाजू फार वेगळी असते. त्यात अनेक डार्क सिक्रेट्स असतात ज्याची कोणाला कल्पनाही नसते. अनेक सेलिब्रिटींबाबतच्या गोष्टी मुलाखतीदरम्यान समोर आल्याही आहेत. अशाच एका अभिनेत्याबद्दलचे सिक्रेट जे कदाचित कोणाला माहित असेल. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक तथा अभिनेता ज्याच्याबद्दल आजही बोललं जातं. त्यांच्या विनोदाने लोकांना हसवण्यासाठी देखील प्रसिद्ध होते. पण रागच्या भरात त्यांचा ते एखाद्या जनावरासारखं वागायचे असंही या अभिनेत्याच्या पत्नीने सांगितलं होतं.
अभिनेता वैयक्तिक आयुष्यासाठी देखील बरेच चर्चेत होते
हा अभिनेता तथा भारतीय चित्रपटसृष्टीतील दिवंगत गायक किशोर कुमार. किशोर कुमार हे केवळ गायक नव्हते तर एक मजेदार आणि मनोरंजक अभिनेता देखील होते. ते त्यांच्या विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. किशोर कुमार यांनी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र, शशी कपूर आणि इतर अनेक दिग्गज हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना आपला आवाज दिला. किशोर कुमार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील बरेच चर्चेत राहिले होते. त्यांनी चार लग्न केली. त्यांची चौथी पत्नी म्हणजे लीना चंदावरकर. त्यांनी एका मुलाखतीत किशोर कुमार यांच्या वागण्याबद्दल तसेच त्यांच्या रागाबद्दल अनेक खुलासे केले होते.
किशोर कुमारच्या चौथ्या पत्नीचा धक्कादायक खुलासा
किशोर कुमारची चौथी पत्नी लीना चंदावरकर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, किशोर कुमार यांच्या वागण्याने त्या खूप घाबरल्या होत्या. लीना यांनी किशोर कुमार यांचं रागातील असं एक रुप पाहिलं होतं कि त्यांना फार भीती वाटली होती. लीना या त्यांच्या नात्याबाबत फार इनसिक्योर होत्या. आणि किशोर कुमार यांनी त्यांना दुसऱ्या कोणत्या स्त्रीसाठी सोडून जावे असे वाटत नव्हते.तसेच त्यांनी पुढे स्पष्ट केले की, किशोरचा मूड सतत चढ-उतार होत असे. तसेच त्यांनी पुढे सांगितले की किशोर यांना वेडा म्हटलेलं आवडत नसे. लीना यांच्या मते, किशोर कुमार कधीकधी गंभीर व्हायचे आणि बालिशसारखं वागायचे.
किशोर कुमार यांचा चेहरा बदलला अन्….
लीना यांनी सांगितले की, किशोर यांनी एकदा लीना यांना विचारले होते की त्यांच्याबद्दल काही अफवा ऐकल्या आहेत का. लीना यांनी नकार दिला कारण लीना किशोर कुमार यांना काही सांगू इच्छित नव्हत्या. लीना म्हणाल्या, “मी ‘प्यार अजनबी है’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मेकअप रूममध्ये होते. जेव्हा मी त्यांना त्यांच्याबद्दलच्या अफवांबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी असा चेहरा केला जो कोणीही करू शकत नाही. त्यांनी प्राण्यांसारखा चेहरा केला आणि मला भीती वाटायला लागली होती, जणू त्यांना वेड लागलं होतं. मी माझ्या हेयर ड्रेसरकडे पाहिले, मग मी म्हटलं की हो मी त्यांच्याबद्दल काही अफवा ऐकल्या आहेत. मग ते म्हणाले की तू मला हे आधी का नाही सांगितलं”
