AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Meenakshi Seshadri | लाखोंच्या हृदयाची ‘धडकन’, कुमार सानूशी चर्चित अफेअर, आता कुठे गायब झालीय बॉलिवूडची ‘दामिनी’?

नव्वदच्या दशकाच्या अखेरीस अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi Seshadri)ने बॉलिवूडला निरोप दिला होता. याआधी, तिने 80 आणि 90च्या दशकाच्या मध्यापर्यंतच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती, ज्यात 'घातक', 'घायल' आणि 'दामिनी' सारख्या अनेक हिट चित्रपटांचा समावेश होता.

Meenakshi Seshadri | लाखोंच्या हृदयाची 'धडकन', कुमार सानूशी चर्चित अफेअर, आता कुठे गायब झालीय बॉलिवूडची ‘दामिनी’?
मीनाक्षी शेषाद्री
| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 7:15 AM
Share

मुंबई : नव्वदच्या दशकाच्या अखेरीस अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi Seshadri)ने बॉलिवूडला निरोप दिला होता. याआधी, तिने 80 आणि 90च्या दशकाच्या मध्यापर्यंतच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती, ज्यात ‘घातक’, ‘घायल’ आणि ‘दामिनी’ सारख्या अनेक हिट चित्रपटांचा समावेश होता. मीनाक्षीचे नाव अशा अभिनेत्रींमध्ये गणले जाते, ज्या त्यांच्या काळातील अभिनय तसेच सौंदर्याच्या बाबतीतही अव्वल होत्या (Know about 90s famous Bollywood actress Meenakshi Seshadri).

80 आणि 90 चे दशकांत या अभिनेत्रीच्या अभिनयाची दूरवर चर्चा होती. मीनाक्षीला इंडस्ट्रीत बरीच प्रसिद्धी मिळाली होती, पण एक दिवस ती अचानक चित्रपट जगातापासून दूर गेली. मात्र, आजही मीनाक्षीच्या चाहत्यांना त्यांची लाडकी अभिनेत्री कुठे आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता असते आणि ती सध्या काय करते आहे? कुठे आहे? याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुकता असतात.

मीनाक्षी का घेतला अचानक बॉलिवूडचा निरोप?

मीनाक्षी तामिळ कुटुंबातील असली, तरी तिचा जन्म झारखंडमध्ये झाला आहे. शिक्षण संपल्यानंतर मीनाक्षीने 1981मध्ये Eve’s Weekly Miss India या स्पर्धेत भाग घेतला होता आणि सर्व स्पर्धकांना मागे टाकत ती विजेती ठरली. यानंतर तिला मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली. 1983 मध्ये ‘पेंटर बाबू’ या चित्रपटातून तिने अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली, पण तिला खरी ओळख मिळाली ती ‘हीरो’ या चित्रपटातून!

या चित्रपटात ती जॅकी श्रॉफसोबत झळकली होती. प्रेक्षकांना दोघांची जोडी खूपच आवडली होती. त्याखेरीज मीनाक्षीच्या सौंदर्य आणि नृत्याचे देखील लोक दिवाने झाले होते. या चित्रपटाला बरेच यश मिळालं, त्यानंतर अभिनेत्री कधीही मागे वळून पाहिले नाही आणि एकामागून एक चित्रपट करत राहिली. एका वर्षामध्ये ती किमान पाच चित्रपट तरी करायची (Know about 90s famous Bollywood actress Meenakshi Seshadri).

ती सध्या काय करते?

1995 साली मीनाक्षीने हरीश नावाच्या एका इन्व्हेस्टमेंट बँकरशी लग्न केले, तेव्हापासून ती फिल्मी जगातापासून दूर गेली. लग्नानंतर ती केवळ दोन चित्रपटांमध्ये दिसली, पण नंतर तिने बॉलिवूडला कायमचा निरोप दिला. मीनाक्षी शेषाद्रीला दोन मुले आहेत. ती आता आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत टेक्सासच्या प्लॅनो येथे राहते. याच ठिकाणी ती एक नृत्य शाळा चालवते. चेरीश डान्स स्कूल असे या नृत्य शाळेचे नाव आहे.

कुमार सानूसोबत प्रेमसंबंध वादात

मीनाक्षी जेव्हा बॉलिवूडचा एक भाग होती, तेव्हा तिच्या नावाशी अनेक वादही जोडले गेले होता. मीनाक्षीवर एका विवाहित पुरुषाला भूलवल्याचा आरोप लावण्यात आला होता. हा माणूस इतर कोणी नाही तर, सुप्रसिद्ध गायक कुमार सानू होता. त्यांच्या अफेअरची बॉलिवूड कॉरिडोरमध्ये बरीच चर्चा रंगली होती. जेव्हा त्यांच्या अफेअरची बातमी चर्चेत होती, तेव्हा कुमार सानूचे लग्न झालेले होते. त्या दिवसांत मीडियामध्ये अशी बातमीही आली होती की, या प्रकरणामुळे कुमार सानू आणि त्यांची पत्नी रीटा भट्टाचार्य यांचे संबंध बिघडले होते. मात्र, मीनाक्षी किंवा कुमार सानू या दोघांनीही या चर्चांवर कधीही स्पष्टीकरण दिले नाही.

(Know about 90s famous Bollywood actress Meenakshi Seshadri)

हेही वाचा :

Photo : मधुरा नाईकचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर; शेअर केले अ‍ॅनिमेटेड बिकिनी फोटो

Photo : यामी गौतमची धाकटी बहीण सुरीली गाजवतेय पंजाबी इंडस्ट्री, पाहा फोटो

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.