विद्यार्थीदशेतच तबला वाजवण्याचा छंद जडला, वर्गातही बाकं वाजवायचे; वाचा, दत्ता शिंदेंचे किस्से

काही गायकांना गायनाची उपजतच देणगी लाभलेली असते. (know about well known ambedkari singer Datta Shinde)

विद्यार्थीदशेतच तबला वाजवण्याचा छंद जडला, वर्गातही बाकं वाजवायचे; वाचा, दत्ता शिंदेंचे किस्से
datta shinde


मुंबई: काही गायकांना गायनाची उपजतच देणगी लाभलेली असते. गाणं आणि संगीत हे त्यांच्या रक्तातच असतं. झपाटल्या सारखे ते गाणं आणि संगीताशी एकरूप झालेले असतात. गायक दत्ता शिंदे हे त्यापैकीच एक आहेत. गरीबीशी तोंड देत त्यांनी आपली ही कला जपली आहे. शिंदे यांच्या जीवन संघर्षाचा घेतलेला हा आढावा. (know about well known ambedkari singer Datta Shinde)

बाकं वाजवणं अन् शिक्षकांचं मारणं ठरलेलंच

दत्ता शिंदे यांचा जन्म 1959 रोजी झाला. बीड जिल्ह्यातील परळी (माजलगाव) तालुक्यातील कानडी हे त्यांचं जन्म गाव. दत्ता शिंदे हे सहा भावंडांमध्ये सर्वात मोठे. प्रसिद्ध कवी, गायक विष्णू शिंदे हे त्यांचे धाकटे बंधू. शिंदे घराण्यात आजोबांच्या काळापासून गाणं आहे. त्यांचे आजोबा पोतराजांची गाणी गायचे. तर, त्यांचे आई-वडील एकतारीवर गाणी गायचे. घरातच गाणं असल्याने त्यांनाही लहानपणापासून गाण्याची गोडी लागली. आई-वडील एकतारीवर गाणं गातात. आपण तबला शिकलो तर घरचीच गायन पार्टी तयार होईल, या विचाराने त्यांनी तबला शिकण्यास सुरुवात केली. साधारण वयाच्या दहाव्या वर्षापासून ते तबला वाजवायला शिकू लागले. तबला वाजवण्यास सुरुवात केली अन् त्याचं त्यांना वेसनच जडलं. शाळेत गेल्यावरही ते शिकण्याकडे दुर्लक्ष करून बाके वाजवत असत. त्यामुळे शिक्षक वैतागायचे आणि परिणामी शिंदेंना चोप द्यायचे. शिक्षकाने मारल्यानंतरही त्यांची सवय सुटली नाही. त्यांचं बाकं वाजवणं आणि शिक्षकांचं मारणं सुरूच होतं.

अशी झाली जडणघडण

तबला शिकल्यानंतर त्यांनी आई-वडिलांना साथ देण्यास सुरुवात केली. याचवेळी आंबेडकरी चळवळीतील कवी, गायक लक्ष्मण राजगुरु यांच्या ते संपर्कात आले. शिंदे यांचे आई-वडील लक्ष्मण राजगुरू यांचीच गाणी गायचे. त्यामुळे त्यांनी शिंदे यांना राजगुरुंच्या स्वाधीन केलं. राजगुरुंनीही शिंदे यांच्यातील कवी आणि गायक हेरून त्यांनी लिहितं आणि बोलतं केलं. शिंदे यांनीही राजगुरुंना गुरु मानून त्यांच्याकडून गीत, संगीत आणि गायनाचे धडे घेतले. राजगुरुंच्या पार्टीत तबला वाजवण्यास सुरुवात केली. त्यानंतर कोरस द्यायलाही सुरुवात केली. अशा प्रकारे त्यांची जडणघडण झाली. त्यानंतर थोडा कॉन्फिडन्स आल्यानंतर त्यांनी त्यांचे बंधू विष्णू शिंदे यांना घेऊन गायन पार्टी सुरू केली. विष्णू शिंदे आणि दत्ता शिंदे दोघेही गायचे. शिवाय विष्णू शिंदे हार्मोनियम तर दत्ता शिंदे तबला वाजवायचे. दोघेही भाऊ वस्त्या वस्त्यांमध्ये गाणं गात फिरायचे. तेव्हा लोक त्यांना काळू-बाळूची जोडी आली म्हणून चिडवायचे. पण लोक प्रेमाने म्हणतात की हिणवण्यासाठी म्हणतात, याकडे या दोघा बंधूंनी दुर्लक्ष केलं आणि आपली संगीत साधना सुरू ठेवली.

आकाशवाणीवर संधी

त्याकाळी आकाशवाणीवर गाणं खूप प्रतिष्ठेचं समजलं जायचं. त्यासाठी प्रत्येक कलावंत धडपडत असायचा. आकाशवाणीवर गाण्यासाठी परीक्षा द्यावी लागायची. त्या शिवाय संधी मिळत नसायची. परंतु, दत्ता शिंदे यांना कोणत्याही परीक्षेशिवाय आकाशवाणीवर गायनाची संधी मिळाली. हे ते अभिमानाने सांगतात.

बड्या गायकांचा सहवास

1972 मध्ये मराठवाड्यात मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळे अनेकांची खायची मारामार होत होती. त्यामुळे मराठवाड्यातील लोकांनी मुंबईची वाट धरली होती. शिंदे कुटुंबही मुंबईत आलं. घाटकोपरच्या असल्फा व्हिलेजमध्ये शिंदे कुटुंब स्थायिक झालं. त्यावेळी शिंदे यांच्या कुटुंबाची परिस्थिती बेताचीच होती. दोन वेळचं खायला मिळायचं एवढंच. घाटकोपरला आल्यानंतर मात्र त्यांना मोठमोठ्या गायकांचा सहवास लाभला. सोपान कोकोटे, मैना कोकाटे, चंद्रकला गायकवाड आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्यासह अनेक गायकांच्या सानिध्यात त्यांना राहता आले. त्यामुळे त्यांचा व्यासंग आणि मित्र परिवारही वाढला.

शिंदेंची गाणी

प्रश्नाचा अर्थ एका ओळीत होता,
पोचीराम राम म्हणण्या टाळीत होता,
जयभीम जयभीम नाममुखी तो घोळीत होता,
पोचीराम राम म्हणण्या टाळीत होता…

आणि

सारे रक्त भीमाचे आटले,
झिजले कसे ते चंदन जसे…

आणि

पामर तव भक्तीचा प्यारा,
गौतमा मला द्यावा सहारा,
ही तुझीच छाया निवारा… (साभार, आंबेडकरी कलावंत) (know about well known ambedkari singer Datta Shinde)

संबंधित बातम्या:

लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडून कौतुक, सोबत काम करण्याचीही ऑफर; जाणून घ्या ‘या’ गायकाचा किस्सा!

याच्या 17व्या वर्षापासून गीतलेखन, दहा हजारांवर गाणी लिहिली; वाचा, कोण होते हरेंद्र जाधव?

‘तूच सुखकर्ता’ ते ‘माझ्या नवऱ्याने सोडलीया दारू…’; वाचा, हरेंद्र जाधवांची हिट गाणी कोणती?, ज्यांनी महाराष्ट्राला वेड लावलं

(know about well known ambedkari singer Datta Shinde)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI